भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवे खासदार कॉग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे 37 हजार 380 मतांनी झाले विजयी.
गोंदिया, दि. 05 जुन 2024 : भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दि. 04 जुन रोजी सकाळी 8 वाजता पासून सुरू झाली होती. या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचे डॉ प्रशांत पडोळे हे 37 हजार 380 मतांनी झाले विजयी आहेत. रात्री उशीरा पर्यंत निकाल लागल्याने आकडे समोर आले नव्हते.
भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेकरिता 19 एप्रिल 2024 रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत 12 लाख 24 हजार 956 लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला होता.
जवळपास 76 .04% मतदान झाले होते. संपूर्ण देशात 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीची मजमोजणी पार पडली असून भंडारा गोंदिया लोकसभेत कॉग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. या लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या वतीने कॉग्रेस पक्षाचे डॉ. प्रशांत पडोळे याना उमेदवारी दिली होती. तर महायुतीच्या वतीने भाजपचे तत्कालीन खासदार सुनील मेंढे याना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढे हे निवडून आले होते. तर याही वेळी आपलाच विजय होईल असा विश्वसस सुनील मेंढे यांनी व्यक्त केला आपण 1 लाख पेक्षा ज्यास्त मताधिक्याने निवडून येणार असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
या निवडणुकीत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी नेते खा. प्रफुल पटेल तसेच कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
नवखे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हि निवडणूक लढविली असून अखेर डॉ प्रशांत पडोळे याचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
तर दुसरीकडे भाजपने या ठिकाणी सुनील मेंढे याना निवडून आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उप मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खा. प्रफुल पटेल यांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सुनील मेंढे याच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.
मात्र कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढवत डॉ. पडोळे यांच्या प्रचारासाठी कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतली होती. तर आलेल्या निवडणुकीच्या निकालात मतदारांनी सर्वाधिक मते डॉ. प्रशांत पडोळे याना देत विजयी केले हे आहे.
नाना पटोले यांची प्रतिष्ठा अधिक मजबूत आणि लोकप्रिय
भंडारा गोंदिया 11 लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशी चर्चा होती. पण शेवटच्या दोन दिवसा अगोदर अचानक डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. असे निश्चित झाल्यानंतर भाजपकडून काँग्रेसच्या उमेदवारावर टीका करण्यात आल्या होत्या. भाजपचे माजी मंत्री परिणय दादा फुके यांनी तर हा डमी कॅंडिडेट काँग्रेसने उभा केला असल्याचंही बोललं होत. तर काँग्रेसच्या डमी उमेदवाराने भाजपच्या तत्कालीन खासदाराला “पाडले” असही म्हणणे बावकर ठरणार नाही. विशेष म्हणजे काँग्रेस कडून आलेल्या निकालामुळे नाना पटोले यांची प्रतिष्ठा अधिक मजबूत आणि लोकप्रिय झाली आहे.