बंद पडलेल्या राजदीप बिल्डकॉम कंपनीच्या उड्डाण पुलावरून लोहा चोरीचा प्रकार समोर

सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 02 जून 2024 : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 06 वर राजदीप बिल्डकॉन कंपनी मार्फत उड्डाण पुलाचे निर्माण कार्य सौंदड ते फुटाळा परिसरात गेले पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे.

तसेच काही आर्थिक कारणामुळे सदर उड्डाणपुलाचे बांधकाम गेली दोन वर्षे पासून बंद असल्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी उड्डाण पुलाच्या परिसरामध्ये असलेले लोखंडी साहित्य रोज चोरी होत असल्याचे समोर येत आहे.

सौंदळ येथील स्थानिक युवक दारूच्या शौक करिता ही चोरी करत असल्याचे देखील बोलले जात आहे. काही युवकांनी त्याचा व्हिडिओ करीत सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सदर युवक हे सौंदळ येथील रहिवासी आहेत. चोरी केलेला साहित्य म्हणजेच लोखंडी सळाखे ही बंद पडलेल्या उड्डाणपुलाच्या परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. चोरी केलेले साहित्य गावातच विक्री केले जात आहे.

सौंदड गावात चोरीचे साहित्य खरेदी करणारे भंगार चे अनेक दुकाने मोठ्या प्रमाणात फलत फुलत आहेत. चोरीच्या मार्गाने विक्री केलेला माल खरेदी करून तो मोठ्या ट्रकमध्ये भरून नागपूर सारख्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जातो, सौंदळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरींचे प्रकार समोर येत आहेत अनेकांच्या दुचाकी, सायकल, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी सह घरातील साहित्य देखील चोरी होत असल्याचं समोर येत आहे.

हेच नाहीतर चोरीचे अनेक साहित्य भंगार दुकान दार रातोरात कटर मशीन ने कट करून ते ट्रक मध्ये भरून नागपूर येथे पाठवतात. मात्र याची चौकशी कुणीही करत नाही प्रशासनाचा या दुकान धरकांवर वरदहस्त असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. या चोरट्यांवर प्रशासन काय कारवाई करणार तसेच भंगार खरेदी करणाऱ्या दुकानदारांची प्रशासन कधी चौकशी करणार हे पाहण्यासारखे असेल.

Leave a Comment

और पढ़ें