वनरक्षक चव्हाण यांना तात्काळ निलंबित करा : ज्ञानेश्वर खोटेले

सडक अर्जुनी, दि. 02 जुन : वन क्षेत्र अधिकारी कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणारे जांभळी सह वनक्षेत्र येथील चिरचाळी बीट परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या गौनखनीज मुरूम, रेती चे उत्खनन केले आहे. तर अतिक्रमण तसेच अवैध वृक्षतोड देखील बीट रक्षक एस. यु. चव्हाण यांच्या संगनमताने झाली आहे. त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांना 30 एप्रिल 2024 रोजी लेखी स्वरूपाचे पत्र तक्रारदार ज्ञानेश्वर खोटेले तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस सडक अर्जुनी यांनी केली आहे. परंतु त्यावर अद्याप कुठली कारवाई झाली नाही. चिरचाळी बिट अंतर्गत मोठ्या प्रमाणात वनाचा ऱ्हास होत चाललेला आहे.

याकडे वन विभाग असम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तक्रार करते खोटेले यांनी केला आहे. आठ दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा ज्ञानेश्वर खोटेले तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस सडक अर्जुनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

Leave a Comment

और पढ़ें