गोंदिया, दि. ०२ जून : शहरातील देवकीनंदन अग्रवाल यांच्या घरून दोन लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली. देवकीनंदन अग्रवाल हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व ९० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख २० हजार ५०० चोरून नेला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी फरहान कुरैशी (२०) व आशिक बन्सोड (२०) दोघांना अटक करत त्यांच्याकडून चोरी झालेला माल हस्तगत केला आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 384