गोंदिया, दी. 27 मे 2024 : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमेचे अवचित्त साधून गोंदिया जिल्यात अहिंसक अंगुलीमाल या महानाट्याचे आयोजन प्रथमच नवेगाव बांध येथे 26 मे रोजी रात्री करण्यात आले होते. सोबतच बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो बौद्ध बांधवानी या धम्म परिषदेला तसेच महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.
जगाला शांती चा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय सर्व सामान्य लोकांना व्हावा तसेच त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन लोकांनी जीवन जगावे या हेतूने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील निर्देशक अशोक जांभुळकर यांच्या ग्रुप च्या वतीने ह्या महानाट्य सादर करण्यात आले असून नागपुरातील कलावंत फैज खान यांनी तथागत गौतम बद्ध यांची भूमिका या नाटकात पार पाडली, अतिशय सुंदर पद्धतीने फैज खान यांनी तथागत गौतम बुद्धाची भूमिका पार पडल्याने रसिकांनी देखील त्यांचे आभार मानले.
तर आयोजित बोद्ध धम्म परिषदेला डॉ भदंत ज्ञानदीप महास्थवीर बौध्दगया, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे, आ. मनोहर चंद्रीकापुरे यांनी मार्गदर्शन केले असून अहिंसक अंगुलीमाल हा महानाट्य पाहण्यासाठी परिसरातील हजारो बौद्ध बांधवानी हजेरी लावली होती.