उन्हाचा तडाखा वाढल्याने थंडगार उसाचा रस पिन्यासाठी नागरिकांची पसंती

गोंदिया, दी. 26 मे : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रवाशी नागरिक थंडगार उशाच्या रसाचा आस्वाद घेताना दिसत आहे. तर याचा फटका वन्य प्राण्याना देखील बसत आहे. पश्चिम विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात तापमान 45.8 अंशावर पोहोचले आहे. त्याच पाठोपाठ गोंदियात देखील काहीशी असिच  परिस्थिती आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तापमान 41.8 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे रस्त्यावर पाहिजे तशी गर्दी दिसत नसून लोक अतिआवश्यक कामा करताच घराबाहेर निघत आहे, नाकाला, तोंडाला रुमाल बांधून लोक घराबाहेर निघत आहे. उन्हाचा  तडाका इतका आहे की अक्षरशः घराबाहेर निघताना अंगाची लाही लाही होत आहे.

त्यामुळे उन्हापासून बचाव करता नागरिक थंड पेयजलाचा आधार घेत आहे, याशिवाय रुमाल आणि टोपी घालूनच घरातून बाहेर लोक निघत आहे. यामुळे थंड पेयजल विकणारे, तसेच टोपी आणि रुमाल यांचे दुकानात दुकानदार मात्र ग्राहकांची वाट बघत आहे, कडक उन्हाळ्यामुळे ग्राहक सुद्धा काही पाहिजे तसे दिसता नाही. घरात कुलर आणि एसीत राहणं लोक जास्त पसंत करत आहेत.

दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर सहसा पडत नाही आहे. हवामान खात्याने वर्तव्यलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हा तडाखा आणखी वाढू शकतो असा अंदाज आहे. ऊन आणि पाऊसचा खेळ सुद्धा विदर्भात बघायला मिळत आहे, अवकाळी पावसानंतर ही अंगाला लाही लाही करणारी ऊन लोकांना जाणवत आहे.

Leave a Comment

और पढ़ें