गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित 8 हजार 810 शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी ध्या.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था च्या वतीने विभागीय सहनिबंधक नागपूर यांना निवेदन 

अर्जुनी मोर, दी. 24 मे : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्हा संघ गोंदिया तसेच तालुका संघ अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर विभाग यांना दी. 22 मे रोजी निवेदन देण्यात आले.  गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी यांची बाकी असलेली प्रोत्साहन पर रासी ॲप सुरू करून गोंदिया जिल्ह्यातील उर्वरित 8 हजार 810 शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत प्रोत्साहन राशी पोहोचवणे हा हेतू बाळगून गोंदिया जिल्ह्यामध्ये कुणीही प्रोत्साहन राशीपासून नियमीत कर्ज भरणारा शेतकरी वंचित राहू नये यासाठी संघटनेच्या तर्फे सर्वतोपरी प्रयत्न केल्या जात आहेत. निवेदन स्वीकारताना स्वतः विभागीय सहनिबंधक चंदेल तसेच हर्षल काडीकर उपस्थित होते.

निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डोमा बोपचे, तालुका अध्यक्ष ललित बाळबुद्धे, संस्था अध्यक्ष प्यारेलाल गौतम तसेच अँड. पोमेश रामटेके सहकार मित्र, कायदे विषयक सल्लागार उपस्थित होते. धान उत्पादक जिल्हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चारही जिल्हातील शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी बाकी असल्याबाबत खूप विस्तृत चर्चा करण्यात आली आणि ते पूर्ण करण्यात यावी आणि पूर्ण होईल असे चर्चेतून निष्पन्न झाले.

Leave a Comment

और पढ़ें