ज्यांच्या कडे शेतीच नाही अश्या लोकांना धानाच्या बोनसचे पैसे मिळाले

6 लाख 2 हजार रुपयाचा अपहार, ऑपरेटर सह दोघाणी केला कार्यक्रम…

भंडारा, दी. 24 मे : जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील ग्राम पिंपळगाव सडक येथिल दि. सहकारी संस्था पिंपळगाव यांनी लाखो रुपयाचा घोटाळा केला आहे. दि सहकारी संस्था पिंपळगाव हे ‘अ, गटातील धान खरेदी केंद्र आहे. 2023 – 24 हंगामात शासनाने सरसकट हेक्टरी 20 हजार रुपये बोनस जाहिर केला. ज्या शेतकऱ्यांनी सात बारा ऑनलाईन केला असा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. पण पिंपळगाव येथील धान खरेदी केंद्रावर जे शेतकरीच नाही अश्या नागरिकांचे बोगस सातबारा काढून ऑनलाइन करण्यात आले.

त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम सुध्दा जमा झाली एकट्या पिंपळगाव धान खरेदी केंद्रावर 25 बोगस शेतकरी आढळून आले आहेत. या विषयी दि. सहकारी संस्था यांना विचारले असताना त्यांनी सांगीतले की हे सातबारे डाटा ऑपरेटर यांनी ऑनलाईन कसे केलें हे माहिती नाही. त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. अशी माहिती मंगेश डहाके, संचालक तथा ग्रेडर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

महत्वाचं की ज्यांच्या नावाने बोनसची रक्कम उचल केली आहे. त्यांच्याकडे शेतीच नाही. तलाठ्यांनी सातबारा दिला नाही. योगराज डामरे तलाठी यांनी तशी माहिती दिली आहे, मग डूप्लिकेट सातबारे आलेच कुठून हा संशोधनाचा विषय आहे. वेगवेगळ्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावांनी पैशाची उचल झाली आहे. हा प्रकार फक्त पिंपळगाव आधारभूत धान खरेदी केंद्रावर उघळ झाला मात्र चौकशी केली तर जिल्हाभर असा प्रकार आढळू शकतो. मात्र अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.

जिल्हा पणन अधिकारी यांना माहिती मिळाली पण आपल्याला कुणीही तक्रार केली नाही त्यामुळें कारवाई कशी करणार असं तुगलकी उत्तर त्यांनी दिला आहे. पणन अधिकारी रजेवर असल्याने जिल्हाधिकारी यांना माहिती विचारली असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. पण शासनाच्या डोळ्यात धूळ घालुन हा घोटाळा करण्यात आला. घोटाळे बाजाणा अधिकारीच सह देतात का ?  हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळें जिल्हाधिकारी, पणन अधिकारी यांच्या आशीर्वादाने बोगस शेतकरी दाखवून शासनाला लुटण्याचा प्रकार तर होत नाही ना अशा प्रशन या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें