पोलिसांच्या वाहनाला इन्शुरन्स ची आवश्यकता नाही, पोलिस विभागाची माहिती.

वृत्त प्रकाशित झाल्याने पोलीस विभागात खळबळ 

गोंदिया, दी. 23 मे 2024 : पोलिस विभागाच्या वाहनांना इन्शुरन्स ची आवश्यकता नाही. अशी माहिती पोलिस विभागाने महाराष्ट्र केसरी न्यूज सोबत बोलताना नुकतीच दिली आहे. विशेष म्हणजे केंद्र शासणाच्या आणि राज्य शासनांच्या वाहनांना विमा पॉलिसी ची आवश्यकता नसते असेही सांगण्यात आले आहे. आज 23 मे रोजी महाराष्ट्र केसरी न्यूज ने एक बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीचे मजकूर पुढील प्रमाणे होते.

1) gondiya l गोंदिया मध्ये फिरतात बिना इन्शुरन्स चे पोलीस वाहन, झालेल्या अपघातावरून प्रकरण आले उघडकीस https://youtu.be/SsOZ2PK3VDs

2) अपघात झालेल्या पोलिस वाहणाचे इन्सुरेन्स नाही, गोंदिया पोलिस विभागाचा अजब कारभार https://maharashtrakesarinews.in/archives/22314

असे दोन्ही बातम्यांचे मजकूर होते. या बातम्या प्रकाशित करण्या मागील कारण म्हणजे काल 22 मे 2024 रोजी गोंदिया मध्ये एलसीबी च्या वाहनाला एका दुषऱ्या वाहनाने मागून धडक दिली होती. ज्या पोलिस वाहनाचे अपघात झाले त्या वाहनाचे आम्ही नंबर ऑनलाईन चेक केले असता विमा पॉलिसी 2021 पासून रीनिवल केलेली नव्हती तर अन्य वृत्त पात्रांनी देखील इन्शुरन्स नसल्याचे मजकूर प्रकाशित केले होते. परिणामी सदर वाहनाचे इन्शुरन्स नाही असे आम्ही गृहीत धरून वृत्त प्रकाशित केले होते.

मात्र वरील मजकूर नुसार बातम्या प्रकाशित झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली, पोलिस विभाग मार्फत सदर बातमीचे गांभिर्य लक्षत घेता महाराष्ट्र केसरी न्युज सोबत संपर्क साधून पोलिस विभागातील वाहनांचे इन्शुरन्स राहत नाही. अशी माहिती दिली गेली आहे. सदर बातमी मुळे जनतेत सभ्रम निर्माण होऊ नये त्या मुळे पोलीस विभागाणे तात्काळ माहिती दीली.

तर पोलिस विभागाच्या वाहनाने एखाद्या वेक्तीचे अपघाती मृत्यू झाल्यास मा. न्यायालय कडून अश्या केश मध्ये आदेश झाल्यास राज्य शासन स्तरावरील पोलिस महासंचालक व पोलीस अधीक्षक मार्फत त्याची भरपाई दिली जाते.

या संदर्भात चंद्रपूर पोलिस अधीक्षकांनी दिलेली भरपाई चे पत्र दि. 15, 11, 2022 अर्जदार श्रीमती मंगला कृष्णकुमार पेंदाम मू. अमराई, ता. राजुरा, जी. चंद्रपुर MACP NO : 23/2017 असे असून अर्जदार यांना 9 लाख 65 हजार 808 रुपये रवींद्रसिंह संतोषसिह परदेशी पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी मोटार वाहन न्याय प्राधिकरण चंद्रपूर येथे सदर रक्कम जमा करण्यात यावी करीता आदेश केले आहे.

सदर बातमी मुळे जनतेत सभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आम्ही प्रकाशित केलेल्या सर्व बातम्या डिजीटल संकेत स्थळावरून डिलिट व प्रायव्हेट केल्या आहेत. सदर वृता बाबद कुठल्याही प्रकारचा जनतेत सभ्रम निर्माण होऊ नये हीच अपेक्षा.

टीम महाराष्ट्र केसरी न्यूज डिजीटल न्यूज नेटवर्क

Leave a Comment

और पढ़ें