गोंदिया, दि. 22 मे 2024 : गोंदियात माल वाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहणाला मागून धडक दिली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचा नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली यात एका तरुणांनाचा मृत्यू झाला असून मुतकामध्ये साहिल कुडमेते याचा समावेश असून मृतक हा गोंदिया शरतील एका कंपनीत जॉब करत होता.
तो चंद्रपूर जिल्यातील रहिवासी आहे. तर जखमी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे आणी वाहन चालक मुरली पांडे हे जखमी आहेत तर इतर तीन तरुण किरकोळ जखमी असून जखमीवर गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना आज 22 मे रोजी 11 वाजता घडली असून पोलिस वाहन वाहन क्रमांक : एम.एच. 12 एस.कीव. 1006 असे असून ट्रक चे नंबर वृत्त लीहे पर्यंत समोर आले नाही.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 589