लाच प्रकरणात गोंदिया पंचायत समितीच्या पशूधन पर्यवेक्षकाला अटक

ऑगस्ट 2023 मध्ये लाच घेणाऱ्या दोघांना केली होती मदत.

गोंदिया, दि. 22 मे 2024 : मांसल कुक्कुट पक्षीगट योजने अंतर्गत कुकुट पालनाकरिता उभारणी केलेल्या शेडच्या अनुदानाचा दुसऱ्या हप्त्याचा धनादेश काढून देण्याकरिता 3 आॅगस्ट 2023 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येथील पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश ईश्वरदास करवाडे ( वय 39 ) व खासगी व्यक्ती महेंद्र हगरू घरडे ( वय 50, रा. चुटीया, ता. गोंदिया ) यांना अटक केली होती. याच प्रकरणात तिसरा आरोपी तेजलाल हाैसलाल रहांगडाले ( वय 57, पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती गोंदिया ) याला लाच रक्कम स्वीकारण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मंगळवार, 21 मे 2024 रोजी गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें