सडक अर्जुनी, दि. 22 मे 2024 : लोहिया शिक्षण संस्था, सौंदड द्वारा संचालीत रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक ( कला व विज्ञान ) विद्यालय, सौंदड येथील फेब्रुवारी/मार्च – 2024 च्या विभागीय शिक्षण मंडळ, नागपुर द्वारा पार पडलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल दिनांक 21 मे 2024 ला घोषित करण्यात आला.
विज्ञान शाखेचा 100% निकाल
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातील विज्ञान शाखेतून एकूण 79 विद्यार्थी प्रविष्ठ झाले व सर्वच 79 विद्यार्थी उतिर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. यापैकी प्राविण्य श्रेणीत – 07, प्रथम श्रेणीत-50, द्वितीय श्रेणीत-22, अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी सूयश मिळविले आहे. दरवर्षीप्रमाणे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये
प्रणय मनोज शिंदे – 86.33%, दीपक रवींद्र खरवडे – 84.33%, कु. काजल मोहरसिंह बघेल – 82.50,
कु.अश्मी अरविंद बिसेन – 81.33%, कु.निकिता चोपराम मेंढे – 79.83%, या विद्यार्थ्यानी विशेष प्रविण्यासह यश संपादन केले.
आय.टी. विषयाचा 100% निकाल
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आय.टी. विषयाचे ज्ञान मिळावे व त्यांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा करता यावी या उदात्त हेतूने संस्थापक जगदीश लोहिया यांनी आय.टी. विषयासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचाच परिणाम मंडळाच्या फेब्रू.-2024 परीक्षेत दिसून येत आहे. आय. टी. विषयात विशेष प्राविण्य मिळविणारे विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी करण शामराव सोनवणे – 96 गुण, दीपक रवींद्र खरवडे – 93 गुण, भूषण घनश्याम शिवणकर – 91 गुण, मुकुल विजय उपरिकर – 91 गुण, कु. आश्मी अरविंद बिसेन – 90 गुण, कु. काजल मोहरसिंग बघेल -90 गुण, या विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाने गुण प्राप्त करून आय. टी. विषयात विशेष यश मिळविले आहे.
कला शाखेचा निकाल 92.40%
विद्यालयातील कला शाखेत एकूण 76 विद्यार्थी मंडळ परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी एकूण 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 92.40% लागला आहे. यामध्ये मनीष हेमराज मेंढे – 80.33%, वर्षा पुंडलिक डोंगरवार 77.33%, कु.उमा भागवत भांडारकर – 72.50%, कु. साक्षी कुलदीप पुराम- 70.33%, सौरभ भास्कर लांजेवार – 68.00%, यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे 10 वी व 12 वीच्या मंडळाच्या परीक्षेत तालुक्यातून प्रथम, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची परंपरा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.
शाळेतील प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक जगदीश लोहिया, संस्था सचिव पंकज लोहिया, प्राचार्य उमा बाच्छल, संस्था व विद्यालयाच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. संस्थापक जगदीश लोहिया यांनी ” विद्यार्थ्यानो आपल्या स्वप्नाचा पाठलाग करून जीवनात आपले ध्येय साध्य करा.” असा संदेश देवून त्यांचे अभिनंदन केले व भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील, संस्थापक जगदीश लोहिया, सचिव पंकज लोहिया, प्राचार्या उमा बाच्छल तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिले.