शिक्षकाने केली सेवानिवृत्त लिपिकाची हत्या!

संस्थेचा वाद विकोपाला, सिद्धार्थ विद्यालय डवकी येथील घटना.

गोंदिया, दि. 16 मे : जिल्ह्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम डवकी येथील महाविद्यालयामध्ये एका लीपीकाची हत्या झाल्याचे प्रकार समोर आले आहे. सदर शाळेचे नाव सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी असे असून मुख्याध्यापक आणि एका शिक्षकांचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्ती लीपिकाला नाहक आपला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना आज दी. १६ रोजी उघडकीस येताच परिसरात खडबळ उडाली आहे.

हत्या झालेल्या सेवानिवृत्त लिपिकाचं नाव मुकुंद बागडे रा. मुल्ला वय ६० वर्ष असे आहे. शाळा, कॉलेज म्हटले तर, विद्यार्थ्याला ज्ञानदान, विद्यार्थ्यांचे भविष्य, समाज घडविण्याचे मंदिर असते. मात्र शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेली नेतागिरी, फसवणूक, लबाडी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे शिक्षक आणि शिक्षणावरही लोकांचा विश्वास जास्त काळ टिकेल काय ? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. लाखो रुपये घेऊन शिक्षण विभागात काही संस्था चालक कर्मचारी भरती करतात. कथित संस्था चालक लबाडी करून आपलेच खिसे गरम करण्याच्या नादात अनेकांना धोका देखील देतात असे अनेक प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. त्या विषयाला सध्या विराम देऊन पुढील वृत पाहू l

सविस्तर असे की, सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे शाळेच्या संस्थेची सभा दी.  १५ रोजी आयोजित करण्यात आली होती. संस्थेची सभा संपली आणि सदर शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे ( वय ५२ ) यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम व यांच्यात शाब्दिक वाद सुरू केला. वाद विकोप्याला गेला की, अचानक आरोपिने माझे आयुष्य बरबाद केले म्हणून मुख्याध्यापकावर हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये मृतक मुकुंद बागडे वाद मिटविण्याचा दृष्टिकोनातून मध्यस्थी करिता गेले असता, खोब्रागडे यांनी रागाच्या भरात मुख्याध्यापकांना सोडून मृतकाना मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला, परिणामी मृतक जागीच बेहोश झाल्यानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

विषय गंभीर असल्यामुळे गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु आज दी. १६ रोजी पहाटे ३ वाजता दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली अशी माहिती समोर आली. तर देवरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध भादवी चे कलम ३०२, ३०७, ३२४, ५०६ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास देवरी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहे.

सदर व्यक्ती एक ते दोन वर्षा अगोदर पंचशील विद्यालय तथा कनिष्ट महाविद्यालय मक्काटोला येथे लिपिक या पदावर कार्यरत होते. त्यानंतर समाजकार्यामध्ये अग्रेसिव राहून काँग्रेस या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. मृतकाची पत्नी कल्पना बागडे मुल्ला ग्रामपंचायत येते सरपंच पदावर कार्यरत आहेत. मृतकाची मुलगी थायलंड येते शिक्षण घेत आहे. मृतकाच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, पत्नी तसेच आप्त परिवार आहे. अचानक झालेल्या घटनेमुळे देवरी तालुकात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें