गोंदिया, दि. 14 मे 2024 : मे 2024 मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने, म्हणजे अँटी करप्शन ( ACB ) ने राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्या आहेत. झालेल्या कारवाई मध्ये मोठे अधिकारी सापडले आहेत. त्यात चंद्रपुर जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी 1 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी 7 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 8 मे रोजी मोठी कारवाई केली. यात गोरेगावचे तहसीलदार किसन भदाणे यांच्या सह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयाची लाच प्रकरणी कारवाई केली आहे.
हे प्रकरण ओलेच असले तरी गोंदिया जिल्ह्यात पुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मोठे मासे गळाला लागले आहेत. जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील नगर पंचायत चे मुख्याधिकारी, नगर अध्यक्ष, सभापती, नगर सेवक, सह एकूण 6 लोकांवर एसीबी ने कारवाई केली आहे. त्या मुळे शासकीय यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि लोक प्रतिनिधी आपल्या पदाचा दूर उपयोग करून सामान्य माणसाची कशी पिळवनुक करतात आणि त्यांची कामे थांबून धरतात त्या मुळे ना इलाज त्यांना अश्या कारवाईला समोर जावे लागते.
सडक अर्जुनी येथे आज 14 मे रोजी एसीबी कडे झालेली तक्रार लाखनी येथील एका 56 वर्षीय पुरुषाने केली आहे. यात आरोपी 1) तेजराम किसन मडावी वय 66 वर्ष नगराध्यक्ष, नगर पंचायत, सडक अर्जुनी, 2) शरद विठ्ठल हलमारे वय 56 वर्ष नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, सडक अर्जुनी व अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी नगर पंचायत, सडक अर्जुनी, 3) अश्लेश मनोहर अंबादे 35 वर्ष, सभापती बांधकाम समीती, 4) महेंद्र जयपाल वंजारी वय 34 वर्ष नगरसेवक, 5) खाजगी वेक्ती जुबेर अलीम शेख/ राजू शेख (नगर सेविकाचे पती) 6) खाजगी वेक्ती शुभम रामकृष्ण येरणे 27 वर्ष, या आरोपींचा समावेश आहे.
गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज दिलेल्या माहिती नुसार तक्रार दि. 13 मे रोजी प्राप्त झाल्या नंतर पळताळणी करण्यात आली. यात आरोपी यांनी 1 लाख 82 हजार रुपये लाचेची मागणी केली असून 12 लाख 15 हजार 634 रुपये रकमेवर 15% प्रमाणे मागणी करण्यात आली होती. नगर पंचायत कार्यालय व तेजराम मडावी यांचे निवासस्थान अश्या दोन ठिकाणी सापळा कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर पने : तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असुन त्यास नगर पंचायत सडक अर्जुनी अंतर्गत वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदान सन 2023 – 24 लेखाशिर्ष (2217 1301) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई -निविदा मंजूर झाल्या असून तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली आहे. कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदार यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष यांनी निविदा रकमेच्या 15% रक्कम लाच मागणी केली असल्याची तक्रार एसीबी कडे केली.
लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता मुख्याधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी नगराध्यक्ष यांची भेट घेण्यास सांगितले. नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता आरोपी तेजराम मडावी याने निविदा रक्कम 12 लाख 15 हजार 634 रुपये रकमेवर 15% टक्के प्रमाणे 1 लाख 82 हजार रुपये लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली व आरोपी शरद विठ्ठल हलमारे नायब तहसीलदार, मुख्याधिकारी नगर पंचायत, अश्लेश मनोहर अंबादे, महेंद्र जयपाल वंजारी, खाजगी वेक्ती जुबेर अलीम शेख यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
सापळा कारवाई दरम्यान आरोपी तेजराम किसन मडावी यांनी लाच रक्कम आरोपी खाजगी वेक्ती
शुभम रामकृष्ण येरणे याचे दुकानात देण्यास सांगितले असून आरोपी नगर अध्यक्ष तेजराम मळावी याने लाच रक्कम स्विकारली. तर सदर आरोपीस लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी क्रं, १,२,३,४ व ६ यांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी क्रमांक : ५ हा फरार आहे. पो. स्टे. डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सापळा करवाई विलास काळे पोलीस उप अधीक्षक, पो.नी. अतुल तवाड़े, पो.नि. उमाकांत उगले,
स.फौ. चंद्रकांत करपे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, ना.पो. शि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, मनापोशी संगीता पटले, चालक ना.पो.शि. दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. जिल्ह्यात कुणीही लोकसेवक पदाचा दूर उपयोग करून लाच रक्कम मागत असल्यास त्याची तक्रार करण्याचे आव्हान गोंदिया एसीबी ने केले आहे.