आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा.


जिल्हा सत्र न्यायल्याने पहिल्यांदाच सुनाविली फासीची शिक्षा, आरोपी किशोर शेंडे याने मध्यरात्री सासरा, पत्नी आणि मुलाला जिवंत जाळले होते.


गोंदिया, दि. 09 मे 2024 : गोंदिया शहराच्या सूर्याटोला भागात राहणारी महिला फेब्रुवारी 2023 रोजी माहेरी आली असताना तिच्या पतीने सासरी येत पत्नी तसेच 5 वर्षीय मुलगा आणि सासर्‍याच्या आंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाडले असून पोलिसानी आरोपीला काही तासातच अटक केली होती हा प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना आज 09 मे रोजी गोंदिया जिल्हा सत्र न्याल्याने आरोपी किशोर शेंडे याला फासीची शिक्षा सुनाविली आहे

ही घटना 14 फेब्रुवारी 2023 ला घडली होती. या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती या संदर्भात कॅडल मार्च देखील काढण्यात आला होता. हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते. अखेर या प्रकरणी आज 9 मे 2024 ला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी आरोपीला फासीची शिक्षा सुनाविली आहे. तर हा निकाल कॉन्फरमेशन करिता हायकोर्टात जाणार असुन तिथुन ही शिक्षा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे तर ह्या प्रकरणाची गंभीरता पाहता या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नागपूर कोर्टात काम करीत असलेले सरकारी वकील विजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनाविण्या करिता महत्वाचे पुरावे घेत युक्तिवाद केल्याने आज हा निकाल मार्गी लागला असून मृतकाच्या कुटूंबियाणी समाधान व्यक्त केला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें