”स्मरण भीमराया” या ऑनलाइन क्वीज कॉम्पिटिशनचे पारितोषिक वितरण माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न.


सड़क अर्जुनी, दि. 05 मे : माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली स्मरण भीमराया या ऑनलाइन क्वीज कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरणाचे कार्यक्रम आज 01 मे रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुनी येथील कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.

विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 स्मरण भीमराया या ऑनलाइन परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 2176 स्पर्धकांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी दिनांक 21 मे रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेत 492 परीक्षार्थी सहभागी झाले होते. एकूण सहाशे मार्क असलेल्या अर्ध्या तासाच्या या परीक्षेत 600 पैकी 600 गुण प्राप्त करणारे सात परीक्षार्थी होते. त्या पैकी तीन परीक्षार्थींनी वेळेत आपला फॉर्म सबमिट केल्याने क्वालिफाईड झाले.

स्पर्धकांनी त्यांचा फॉर्म किती वेळात सबमिट केला त्या बेसिसवर त्यांची रँक ठरवण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक संगीता चंदनखेडे राहणार वनी यांची वर्णी लागली त्यांना तीस हजार रुपये रोख व थायलंडून वरून आणलेली बुद्धमूर्ती, प्रशस्तीपत्र व शील्ड देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले.

तर द्वितीय क्रमांकासाठी नुशान घनश्याम हुमणे नागपूर यांना वीस हजार रुपये रोख रक्कम व थायलंड इथून आणलेली बुद्धमूर्ती आणि शील्ड देण्यात आली तसेच तृतीय क्रमांकासाठी स्वाती विकास उंदीरवाडे राहणार निलज जिल्हा गोंदिया यांना दहा हजार रुपये रोख रक्कम व थायलंड वरून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र आणि शील्ड देण्यात आले.

सर्वोत्तम दहा स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व थायलंड वरून आणलेल्या बुद्ध मुर्त्या प्रदान करण्यात आल्या, स्पर्धेचे आयोजन राजकुमार बडोले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले, राकेश भास्कर, प्रशांत शहारे यांनी केले.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, माजी सभापती गिरधारी हत्तीमारे, माजी उपसभापती राजेश कठाणे, प्रल्हाद वरठे, तुलाराम येरणे, तुकाराम राणे, रंजनाताई भोई आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात स्पर्धक स्पर्धकांचे पालक व बहुसंख्याक उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें