गोंदियात 541 कोटी रुपयाचा धान्य नष्ट होण्याच्या मार्गांवर


१५० रुपये किवींट्ल भरडाई मिळे पर्यंत धान्य भरडाई बंद राहणार राईस मिलर्स

33 राईस मिलर्स काळ्या यादीत टाकून त्यांचे करारनामे रद्द होणार 


गोंदिया, दी. 05 मे : धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्यात 183 शासकीय आधार भूत धान्य खरेदी केंद्रान वरून खरेदी केलेला 541 कोटी रुपयाचा धान्य नष्ट होणायाच्या मार्गावर पडून आहे. याला कारण म्हणजे गोंदिया जिल्यातील राईस मिलर्स संघटनेने आपल्या विविध मागण्यान साठी धान्य भरडाई बंद करून ठेवली आहे. मागील सहा महिन्या पासून खरेदी केलेला 24 लक्ष 77 हजार 996 किविंटल धान्य भरडाई न झाल्याने खरीप हंगामात खरेदी केलेला धान्य नष्ट होण्याचा मार्गांवर आहे. तर रब्बी हंगामाचा धान्य खरेदी करून ठेवायचा कुठे असा प्रशन जिल्हा पणन कार्यालयाला पडला आहे.

गोंदिया जिल्यात वर्ष 2023-24 या काळात जिल्हा मार्केटींग फेडरेशन कडे गोंदिया जिल्यात 1 लक्ष 25 हजार 129 शेतकऱ्यांनी धान्य विक्री करिता ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी 80 हजार 806 शेतकऱ्यांनीच शासकीय धान्य खरेदी केंद्रावर 24 लक्ष 77 हजार 996 किविंटल धान्य विक्री केला असून या धान्याचे 540 कोटी 94 लक्ष 53 हजार 76 रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.

खरेदी केलेला धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे गोंदिया जिल्यातील 353 राईस मिलर्स पैकी 196 राईस मिलर्स ने धान्य भरडाई करण्यासाठी करार फॉर्म ची उचल केली होती. त्यापैकी 33 राईस मिलर्स ने धान्य भरडाई चा करार जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे केला असून सुद्धा धान्य भरडाईला सुरवात केली नसल्याने पणन विभागाने 15 एप्रिल 2024 ला गोंदिया जिल्यातील राईस मिलर्स सोबत विडिओ कॉन्फरनसिग द्वारे मिटिंग घेत धान्य भरडाई करण्याची विनंती केली मात्र राईस मिलर्स आपल्या मागण्या वर अडून असल्याने धान्य भरडाई चा मार्ग निघाला नाही.

तर काय आहेत राईस मिलर्स च्या मागण्या पाहूया…1 ) 150 रुपये किवींटल प्रमाणे भरडाई दर द्यावे, 2) हमाली दर वाढवून द्यावे, 3) वाहतूक दरात वाढ करावी या शह अन्य मागण्यांना घेऊन राईस मिलर्स धान्य भरडाई करण्यात तयार असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तॊ पर्यंत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा राईस मिलर्स ने घेतला आहे.

तर 2 मे 2024 पर्यंत गोंदिया जिल्यातील करार केलेल्या 33 राईस मिलर्स ने धान्य भरडाईला सुरवात केली नाही अश्या 33 ही राईस मिलर्स ला काळ्या यादीत टाकून त्यांचे करार नामे देखील रद्द करणे EMD जपत करून त्याचा अहवाल पाठविण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा विभागाने पणन विभागाला दिल्या आहेत. तर दुसरीकडे जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही. तो पर्यंत धान्य भरडाई करणार नाही. असा पवित्रा राईस मिल मालकांनी घेतला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें