गोंदिया : जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळख आहे. या जिल्ह्यामध्ये शेतकरी पारंपारिक पद्धतीने उन्हाळी व पावसाळी या दोन ऋतूमध्ये भाताची शेती मोठ्या प्रमाणात लाऊन भरघोस उत्पन्न मिळवतो. जिल्ह्यामध्ये पूर्वी होणारी भात पिकाची शेती ही बैल बंडीच्या माध्यमातून तसेच मजुरांच्या साहाय्याने केली जायची मात्र आता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळले आहेत. त्यातच काही शेतकऱ्यांचे अनुभव आहे की मशनरीचे युग आल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात धानाची कापणी व मळणी होत आहे.
याच भाताच्या शेतीतून अनेक नागरीकांना पूर्वी रोजगार मिळायचे तर जनावरांना सुद्धा याच शेतीमध्ये कामाला लावायचे त्या जनावरांच्या विष्ठेतून मिळणारे गोबर पासून शेतकऱ्यांना खत देखील मिळायचे शेतकरी आता यांत्रिकी युगाकडे वळला असून शेतीमध्ये काम करणारा मजूर वर्ग देखील शेतातून नाहीशी झाल्यासारखे चित्र आहे. शेताची नांगरणी करणारे आणि बैलबांडीचा वापर करणारे शेतकरी देखील विलुप्त झाल्याचे चित्र आहे. पूर्वी शेतकरी धान कापून त्याचे गंजी तयार करून त्यानंतर मशीनद्वारे किंवा बैल बंडीच्या साह्याने भात पिकाची मळणी करून तनस वेगळी व धान वेगळा करण्याची प्रक्रिया करीत होते मात्र ते दिवस आता फोटो पुरतेच राहतील की काय असे चित्र तालुक्यात दिसायला सुरुवात झाली आहे.
शेतीमध्ये राबणारे बैल आता फक्त रेती मध्ये राबायला लागले आहेत. आणि शेतकऱ्यांनी शेतीमध्ये राबवण्यासाठी आता तांत्रिक साधनांचा वापर करून कमी वेळामध्ये शेती कशी करता येईल यावर शेतकरी भर देत आहे. त्याचबरोबर गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा असला तरी या जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात फळबाग तसेच मक्का पीक देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहे. त्यामुळे पारंपारिक असलेली भाताची शेती भविष्यात विलुप्त होते की काय अशी भीती वेक्त होत आहे.
शेतकरी ( मशिनरींचा ) वापर करून कमी वेळामध्ये कशी शेती करता येईल तसेच बचत कमीत कमी कशी होईल याकडे लक्ष देत शेती करीत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करण्यासाठी देखील मजूर मिळत नसल्याने या मार्गाचा अवलंब करावा लागला आहे. ट्रॅक्टर व हार्वेस्टर च्या साह्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करीत आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये काही भागात 12 तास तर काही भागात 8 तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ते परवडन्या सारखे नाही. त्या मुळे शेतकरी आता मक्का शेतीकडे वळू लागला आहे.
काही शेतकऱ्यांचे सांगणे आहे की पूर्वी धान पिकाच्या शेती मध्ये एका एकराला म्हणजे कापणी आणि मळणीला साथ हजार रुपये खर्च यायचा त्यातही 10 एकर शेतीला 10 दिवस लागायचे आता हारवेस्टर मुळे एका एकराला 3 हजार रुपये खर्च येते आणि 10 एक्कर शेतीचे काम एका दिवसात होते. त्यामुळे यात्रिकी युगात शेतीचे कामे आता पूर्वी पेक्षा कमी खर्चीत आणि कमी वेळात होतात.