‘माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही, आरोपी अमोल शिंदे


नवी दिल्ली, वृत्तसेवा, दी. 14 डिसेंबर : सदेची सुरक्षा भेदल्याची घटना घडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. लोकसभेत खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर सभागृहात एकच खळबळ उडाली.



या प्रकारानंतर अमोल शिंदेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही, अशी माहिती आरोपी अमोल शिंदेने दिल्ली पोलिसांना दिली आहे.



संसदेच्या सभागृहात आणि बाहेर चार जणांनी आंदोलन केलं. या चार जणांपैकी महाराष्ट्रातील एकाचा सामावेश आहे. संसदेच्या बाहेर आंदोलन करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरचा असून तो पोलीस भरतीची तयारी करत असल्याची माहिती हाती आली आहे.



संसदेत आणि बाहेर आंदोलन करणाऱ्या चारही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लातूरच्या तरुणाने दिल्ली पोलिसांच्या चौकशीत मी कुठल्याही संघटनेशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दिल्ली पोलिसांनी काय सांगितलं?

संसदेच्या सुरक्षा भेदल्याप्रकरणातील प्राथमिक तपासात उघड झालं की, ‘अमोल आणि नीलम या दोघांना संसदेच्या बाहेरील संकुलात पकडण्यात आलं. हे दोन लोक मोबाईल फोन बाळगत नव्हते. त्यांच्याकडे कोणतीही बॅग किंवा ओळखपत्र नव्हतं. ‘घुसखोर’ अमोल शिंदे दावा केला आहे की, स्वत: संसदेत पोहोचला. त्याने कुठल्याही संघटनेशी संबंधित असल्याशी नकार दिला आहे. चौकशीसाठी पोलीस विशेष टीम तयार करत आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

कोण आहे अमोल शिंदे?

लोकसभा सभागृहात आणि बाहेर आंदोलन करणारा अमोल शिंदे हा लातूरचा आहे. तो पोलीस भरतीची तयारी करत होता. तो लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील झरी (बुद्रूक) येथील रहिवासी आहे.

अमोलचे आईवडील मोलमजुरी करतात. गेल्या अनेक दिवसांपासून तो गावात राहत नव्हता. पोलीस भरतीसाठी तो दुसऱ्या गावाला राहत होता, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे.


https://x.com/Marathi_Rash/status/1734986305522782480?t=cVMw-yf9deNhcZibhZ0dlQ&s=09


 

Leave a Comment

और पढ़ें