सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 14 डिसेंबर : तालुक्यात अवैध रित्या सुरू असलेल्या गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे हे आपल्या पथकासह 13 डिसेंबर च्या रात्रीला गस्तीवर असताना गुप्त सूत्रानी दिलेल्या माहितीच्या आधारावर अवैध रित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करीत असलेल्या एका वाहनावर कारवाई केली आहे.
रात्री रेती घेऊन जात अशलेल्या वाहन चालकाला विचारपूस केली असता त्याच्या कडे रेती वाहतुकीचा कुठलाही परवाना ऊपलब्ध नसल्याने वाहन जप्त करण्यात आले. वाहन चालक जयेनद्र ईश्वरदास झींगरे आणि वाहन मालक देवानंद सदाशिव वंजारी दोन्ही राहणार तेली घाटबोरी असे असून वाहन मोकाशी टोला येथे रात्री 10 : 52 वाजता जप्त करण्यात आले. वाहन क्रमांक : एम.एच.35 ए.जी. 2447 असे असून विना क्रमांकाची ट्रॉली आहे.
यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी वरून कुमार शाहारे अर्जुनी मोर, तहसीलदार निलेश काळे सडक अर्जुनी, मंडळ अधिकारी ब्रिजलाल वरखडे सडक अर्जुनी, मंडळ अधिकारी बी.एस. ठाकरे डव्वा, मंडळ अधिकारी बघेले शेंडा, प्रकाश वैद्य तलाठी डव्वा, तलाठी आशिष रंगारी कोसमतोंडी, वाहन चालक देवगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. रात्री झालेल्या या कार्यवाई मुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जप्त केलेल्या वाहनावर 1 लाख 25 हजार रुपयाचा दंड होणार असून वाहन मालकाकडून तो वसूल केला जाणार आहे.