पुन्हा जिल्ह्यात हत्तीच्या कळपाची एन्ट्री


  • एकीकडे अवकाळी पावसाचा कहर तर दुसरी कडे हत्यांचा उछान्द, शेतपिकांची नासाडी 

अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) दी. 12 डिसेंबर : अवकाळी पावसाने मागील आठवड्यात सलग चार दिवस हजेरी लावून धान पिकाचे मोठे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. या संकटातून शेतकरी कसाबसा सावरत असताना शनिवारी ता. 09 डिसेंबर च्या रात्रीच्या सुमारास हत्तीच्या कडपाणे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली नागंणडोह परिसरात एन्ट्री करीत शेतातील धानाच्या पूजन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

हत्तीच्या कडपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अवकाडीनंतर आता शेतकऱ्यावर हत्तीच्या कळपाचे संकट उभे ठाकले आहे. पश्चिम बंगाल मधून दाखल झालेल्या रानटी हत्तीच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर. तालुक्यात सहा महिन्यापूर्वी एन्ट्री करत मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह राजोली/ भरणोली, रामपुरी चान्ना, बाकटी व नवेगावबांध या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान केले होते.

यानंतर हा हत्तीचा कळप नागणडोह मार्गे गडचिरोली जिल्ह्यात परत गेला होता. त्यामुळे जिल्हावासी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धानाची कापणी आणि मळणी केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून पुंजने शेतात रचुन ठेवले आहे. मागील आठवड्यात सलग अवकाळी पाऊस झाल्याने मळणीची कामे थांबली होती.

तर दोन-तीन दिवसापासून वातावरणाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांनी धानाच्या मळणीचे कामे सुरू केली आहे. दरम्यान शनिवारी ता. 9 रात्रीच्या सुमारास हत्तीच्या कडपाने गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून नागणडोह मार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली. राजोली भरणोली येथील शेतकरी नीलकंठ बुधराम हारमी यांच्या शेतातील पाच एकरातील धानाच्या पूंजण्याची पूर्णपणे नासधुस केली.

यामुळे या शेतकऱ्यावर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. दरम्यान भरणोली येथील शेतकऱ्यांनी त्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. वन विभाग कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच भरनोली येथे पोहोचत नुकसानीचे त्वरीत पंचनामे केले. तसेच हत्तीच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी पथक पाठविले.

रानटी हत्तीचे कळप जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक हत्तीच्या कडपाच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत. हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यात एन्ट्री केली असून भरनोली परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घातला आहे. तर हत्तीच्या कडपाचा मुक्काम याच परिसरात असल्याने वन विभागांनी या परिसरातील शेतकऱ्यांना सजग राहण्याचा इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाचा मुक्काम अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनोली, नागणडोह परिसरात आहे. या कळपात 25 च्या वर हत्ती असल्याची माहिती आहे. या कडपाचा परिसरात मुक्काम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर अवकाळी पावसा नंतर आता हत्तीच्या कडपापासून धानाच्या पुजण्यांचे संवर्धन करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. सध्या हत्तीचा कळप आज तारीख 11 रोजी गोंदिया- गडचिरोली सीमेजवडील कुरखेडा जवळ सिंधपुरी गावाकडे असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें