सावंगी नाल्यातून रेतीचा अवैध उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष ?

( फाईल फोटो )


  • चोराच्या मनात चादण्या असा प्रकार तालुक्यातील महसूल विभाचा ? 

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 08 डिसेंबर : तालुक्यातील नदी व नाल्यातून वाळूचा उपसा जोमात सुरू आहे. सध्या तालुक्यातील सर्व नदी घाट बंद आहेत. असे असले तरी तालुक्यात वाळू उपसा सातत्याने सुरू आहे. सावंगी येथील शशिकरण नाल्यातून देखील मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. या पूर्वी म्हणजे उन्हाळ्यात या नाल्यातून 40 ते 50 लाख रुपयाची वाळू चोरी करण्यात आली होती. सावंगी ते भदूटोला या मार्गावर असलेल्या ससिकरण नाल्यातून अगदी पुला जवळून वाळूची चोरी केली जाते. त्या मुळे पुलाला सुधा भविष्यात धोका होण्याची शक्यता आहे. रात्रीला नदी पात्रातून ट्रॅक्टर ने वाळू काढून त्याचे डंप केले जाते. तर ही वाळू ट्रॅक मध्ये भरून ज्यास्त दरात विक्री करीता बाहेर पाठविली जाते.

नाव न उजागर करण्याच्या सर्यतीवरून काही शेतकरी सांगतात. अधिकाऱ्यांना फोन केला तर प्रतिसाद देत नाही. त्या मुळे तालुक्यातील प्रशासन विकला गेला आहे. असे शेतकऱ्याचे मत आहे. रात्री या नाल्यावर वाळू माफियांची मोठी फौज उपस्थित राहते. सामान्य माणसाला रात्री 12 वाजल्या नंतर घराबाहेर निघणे कायद्याने चुकीचे आहे. मात्र अवैध कारभार चालविणाऱ्या लोकांची रात्री जत्रा लागते. रात्रीला गस्तीवर फिरणारे पोलिस पथक या लोकांवर कुठलीही कारवाई करीत असल्याचे तालुक्यात चित्र दिसत नाही. तालुका पोलिस प्रशासन आणि महसूल विभागाचे या लोकांना आशीर्वाद आहे. त्या मुळे तालुक्यात रात्रभर विना परवाना वाळूचा उपसा करून वाहतूक केली जाते असे यावरून दिसून येते.

राजकीय कार्यकर्ते वाळू चिरीच्या वेवसायात !

तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते वाळू चोरीच्या कामात आहेत. विशेष म्हणजे दिवसाला राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात नेत्यांबरोबर राहून, पांढरे कपडे वापरून नेतागिरी करणारे कार्यकर्ते रात्रीला काळे धंदे चालवतात. आणि अश्या लोकांना राजकीय पक्षातील काही नेत्यांचे वरद हस्त देखील आहे.

महसूल विभागाला लाखोंचा चुना ! 

तालुक्यात नियमित वाळू चोरी होत असल्याने महसूल विभागाला रोज लाखो रुपयांचा चुना लागत आहे. रोज रेतीची चोरी केली नाही तर कर्ज काढून घेतलेले वाहांनाचे हप्ते कुठून भरणार अशी परिस्थिती तालुक्यातील कथित वाळू माफियांची आहे.

या भागातून होते रेतीची चोरी !

तालुक्यातील ग्राम फुटाळा, पीपरी, सौंदड, घाटबोरी तेली, सावंगी, सावंगी 2, कोहमारा, वडेगाव, घटेगाव, सडक अर्जुनी, बामणी/ख., पांढरी/रेंगेपार, शिंदिपार घोगराघाट, आदर्श कोहली टोला, रेंगेपार /पांढरी, शेंडा, राका/पळसगाव सह अन्य गावा लगत असलेल्या नदी व नाल्यातून रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो.

प्रशासना कडून कारवाई ची अपेक्षा!

तालुक्यातील महसूल विभागाकडे कारवाई करण्यासाठी स्वताचे चालू वाहन नाही. वाहन आहे. पण बिघडलेल्या वस्तेत आहे. वाहनात डिझेल नाही. अशी अवस्था आहे. तहसीलदार निलेश काळे यांच्याशी सुरवातीला आम्ही संपर्क केला आणि तालुक्यातील अवैध रित्या सुरू असलेल्या प्रकाराबद्दल त्यांना अवगत केले असता त्यांनी सर्व प्रकार सांगितला.

या पूर्वी असलेले तहसीलदार गणेश खताडे यांनी सुधा असेच सांगितले होते. त्या मुळे ते स्वतःच्या वाहनाने जाऊन तालुक्यात फिरत होते. असे त्यांनी सांगितले होते.

दुचाकी वाहनाने गस्तीवर गेल्यास रेती माफिया धडक देऊन एखाद्या अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला जीवे मारतील अशी भीती अधिकाऱ्यांना आहे. मग महसूल विभागाचे अधिकारी पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत का ? घेत नाही. एकंदरीत कारवाई करणेच नाही. हा त्या मागील खरा मुद्दा आहे का ? असा सवाल देखी या निमित्ताने महाराष्ट्र केसरी न्यूज उपस्थित करीत आहे. एकूणच चोराच्या मनात चादण्या असा प्रकार तालुक्यातील महसूल विभाचा आहे का ?


 

Leave a Comment

और पढ़ें