अज्ञात वाहनाला धडक, दुचाकी चालकाचे उपचार दरम्यान मृत्यू


सडक अर्जुनी, दी. 04 डिसेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणारे पोलिस स्टेशन डूग्गीपार हद्दीत अपघात झाला.  राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक : 53 वर 03 डिसेंबर रोजी दुपारी एका दुचाकी वाहन धारकाचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जख्मी झाला. त्याला उपचारासाठी गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता. त्याचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, पोलीस मदत केंद्र डोंगरगाव च्या हद्दीत 3 : 35 वाजता च्या सुमारास देवरी ते नागपूर जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर ग्राम सावंगी ( ब्राह्मणी ) गावाजवळ मोटरसायकल स्कूटी क्रमांक एम.एच. 36 ए.जी. 0823 च्या चालकाने एका अज्ञात ट्रक ला मागून धडक दिली त्या अपघातात स्कुटी चालक मृतक : विजय ईश्वरदास राऊत ( वय 40 ) राहणार किनी एकोडी ता. साकोली जिल्हा भंडारा यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्त निघले.

घटना स्थळी उपस्थित लोकांनी 108 एम्बुलेंस ला फोन लावून ग्रामीण रुग्णालय सड़क अर्जुनी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र पाहिजे ती सुविधा ऊपलब्ध नसल्याने जखमीला गोंदिया येथील सहयोग हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अज्ञात ट्रक घटनास्थळावरून पळून गेल्याने संध्याकाळ पर्यंत त्याबाबत माहिती मिळू शकली नव्हती. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. अज्ञात वाहनाचा सोध सुरू आहे. विजय ईश्वरदास राऊत हे सडक अर्जुनी येथे विद्युत विभागात लाईन मेन चा काम करीत होते. डूगगीपार पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें