भरधाव क्रेनने पाणीपुरीच्या ठेल्याला उडविले, पाणीपुरी विक्रेत्याचा जागीच मृत्यु


गोंदिया, दि. 03 डिसेंबर : आमगाव – सालेकसा मार्गावर असलेल्या ग्राम पानगाव येथे रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेनने चिरडल्याची घटना 02 डिसेंबर रोजी दुपारी 03 वाजे घडली. जागेश्वर उईके ( वय 33 ) हे कुनबिटोला येथील निवसी आहेत. पानगाव येथे पाणीपुरी विक्री करिता जात असताना मागच्या बाजूने येत असलेल्या भरधाव क्रेनने धडक दिली. या धडकेत जागेश्वर याचा जागीच मृत्यू झाला.

तर पाणीपुरीचा ठेला पूर्ण चेंदामेंदा झाला. घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी छत्तीसगढ राज्याला जोडणारा आमगाव – सालेकसा महामार्ग रोखुन धरला होता. मृत्काच्या कुटुंबाला भरपाई देण्याची मागणी दरम्यान केली आहे.

तसेच पोलिस प्रशासणावर देखील गावकर्यांनी आरोप केला आहे. मुख्य मार्गावर अवजड वाहन नियमित उभे असल्याने या पूर्वी देखील या भागात अपघात झाले आहेत. त्या मुळे पोलिस प्रशासन देखील तेवढच जबाबदार आहे. वाहन जप्त करून दोषी आरोपीवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली आहे. मृतक हा अत्यंत गरीब घरचा असल्यामुळे परिवाराचा गाळा आता समोर कसा चालणार असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें