माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन


गोंदिया, दी. 03 डिसेंबर : गोंदिया तालुक्यातील ग्राम कटंगी कला येथे पूजा अखिलेश सेठ, सभापती, समाजकल्याण यांच्या प्रयत्नाने सेन्ट्रल कृषक संस्था समोरील सिमेंट रोड, नाली व गट्टू बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते, पूजा अखिलेश सेठ यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, आमचे नेते खासदार प्रफुल पटेल हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता सदैव कटिबद्ध आहेत. बिरसी विमानतळ वरुन नियमीत हवाई सेवा सुरू होणार असून शेतकरी व व्यापाराला चालना मिळेल. धान खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांच्या धानाला बोनस मिळावा यासाठी, सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन श्री जैन यांनी केले.

या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, पूजा अखिलेश सेठ, बाळकृष्ण पटले, मोहिनी वराडे, महेश लांजेवार, अखिलसिंग ठाकूर, अनिल हिरकने, डॉ.योगराज तुरकर, दीपक बनसोड, राजू महारवाडे, उमेश बावनकर, तीर्थराज बघेले, रवीकला नागपुरे, मुमताज पठाण, सुभाष बावनकर, दीपक डोंगरवार, मंजीत सहारे, शिशुपाल उपरीकर, शैलेश वासनिक, कृष्णा प्रजापती, दिलीप मोहनकर, रंजीत ऋषी, कमला श्रीभद्रे, ललिता वराडे, देवीश्री नागरिकर, दीपलता बाणेवार, रफिक शेख, निलेश देशभ्रतार, पप्पू नागपुरे, जियालाल कटरे, आबिद शेख, संतोष फुंडे, छमेंद्र नागरिकर, राजेश वराडे, धिरज घोसे सहीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सदाशिव वाघाडे व आभार प्रदर्शन तीर्थराज बघेले यांनी केले.


 

Leave a Comment

और पढ़ें