- माजी मंत्री राजकुमार बडोले मित्र परिवार तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया, दि. 03 डिसेंबर : गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील ग्राम तुमसर येथे आज 03 डिसेंबर रोजी ‘युगंधर अल्बम’ गाण्यांचा वादळ वारा म्युजिकल कार्यक्रमाचे माजी मंत्री राजकुमार बडोले आणि मित्र परिवार तर्फे आयोजन करण्यात आले आहे. युगपुरूष, परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या स्मृति प्रित्यर्थ माजी मंत्री राजकुमार बडोले मित्र परिवारातर्फे तुमसर येथे प्रसिध्द गायक अनिरूध्द वनकर यांच्या वादळवारा या म्युजिकल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम आज 03 डिसेंबर रोजी सायंकाळी 07 वाजता बहुजन हिताय बहुजन सुखाय या बौध्द विहाराच्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात माजी मंत्री राजकुमार बडोले, सह सौ. शारदाताई बडोले लिखित युगंधर अल्बम च्या गाण्यांचे प्रस्तुतीकरण वादळवारा गृपचे कलावंत करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रसिध्द संगीतकार व दिग्दर्शक भुपेश सवाई यांच्या सुरेल संगीताची साथ मिळणार आहे.
या कार्यक्रमात माजी मंत्री राजकुमार बडोले व सौ. शारदाताई बडोले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक इंजी. राजकुमार बडोले मित्र परिवार व योगेश्वर बहुउद्देशिय शिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.