हात पाय, गळा आवळून 19 वर्षीय तरुणाची हत्या, तीन आरोपी अटक


भंडारा, दि. ०२ डिसेंबर : तीन दिवसांपूर्वी रात्री दहा वाजताच्या सुमारास नयन मुकेश खोडके हा १९ वर्षीय तरुण घरी न सांगता निघून गेला होता ३० नोव्हेंबरला कोरंभी-सालेबर्डी नाल्यात संशयितरीत्या मृतावस्थेत आढळला होता. पोलिसांनी एका दिवसात आरोपींचा छडा लावला. यात प्रेम प्रकरणातून नयनचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

मंथन अशोक ठाकरे (१९), रा. भोजापूर, साहिल शरद धांडे (१९), ठाणा पेट्रोल पंप, पूनम नरेंद्र कारेमोरे (१९), बीड, सीतेपार अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनीही संगनमत करून नयनला सालेबर्डी-कोरंभी मार्गाने नेले. घटनास्थळी नयनचे हातपाय बांधून गळफास लावला. त्यानंतर नयनला नाल्यात फेकून दिले. प्रेम प्रकरणातून नयनचा खून झाल्याची बाब समोर आली आहे. आरोपी विरुद्ध विविध कलमा अन्वय गुन्हे नोंद केले असून प्रकरनाची माहिती पोलिसांनी दिली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें