अज्ञात वाहनाच्या धडकेत बीबट ठार, कोहमारा-नवेगावबांध मार्गावरील घटना.


सडक अर्जुनी, दी. ०२ डिसेंबर : कोहमारा-नवेगावबांध रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कोहमारा-नवेगावबांध रस्ता हा नवीन नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या बफर झोनमधून जातो. वाघ, बिबट्या, अस्वल यासारखे प्राणी या मार्गावरून फिरतात. मात्र वाहनांच्या वेगमर्यादेबाबत माहिती देणारे फलक न लावल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे वन्यप्राण्यांना वाहनांची धडक बसते.

यातच मनेरी-चिखली रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनचालकाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला धडक दिली. या घटनेत बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 06:30 वा. घडली.  आठ ते दहा महिन्याचा बिबट मादी मृत पावले याची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळी वन विभागाची टीम हजर झाली. घटनेचा पंचनामा करण्यात आला.  रात्री उशीर झाल्यामुळे शव विच्छेदन दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आले. त्यानंतर अग्नि दहन करण्यात आले.


 

Leave a Comment

और पढ़ें