गावात असाच एकोपा चिरकाल टिकवुन ठेवावा : ईजी. यशवंत गणवीर


सडक अर्जुनी, दि. ३० नोव्हेंबर : आपण आपल्या छोट्याशा गावात एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले व शांततेत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. ज्या प्रमाणे या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलात असाच एकोपा चिरकाल टिकवुन ठेवावा. या ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून आपल्याला बरेच काही शिकता आले ते आपण आपल्या जीवनात आचरणात आणावे. असे प्रतिपादन त्यांनी केले. यशवंत गणवीर उपाध्यक्ष यांनी केले.

ते तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथे दिनांक २९ नोव्हेंबर रोज बुधवार ला गोपालकाला व महाप्रसाद च्या कार्यक्रम दरम्यान मंचवरून बोलत होते.  दिनांक २२ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत भागवत ज्ञानयज्ञ चे आयोजन करण्यात आले होते. या भागवत ज्ञानयज्ञाची समाप्ती २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. गोपालकाल्याची दहिहंडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या शुभहस्ते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली फोडण्यात आली. दरम्यान मंचावरून त्यांनी आपले मत वेक्त केले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार, रांकापा तालुकाध्यक्षा रजनी गिरीपुंजे, माजी सभापती राजेश नंदागवळी, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, पं. स. सदस्य शिवाजी गहाणे, काशीनाथ राणे, ईश्वर कोरे, देवचंद तरोणे, अनिल बोरकर, देवानंद कोरे, हितेश बडोले, रंजनाताई झोळे, लक्ष्मीबाई उके, देवचंद शिवणकर तथा गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 


 

Leave a Comment

और पढ़ें