निर्माणाधीन बोगद्यात 41 कामगार 15 दिवसांपासून अडकले ?


वृत्तसेवा, नवी दिल्ली, दी. 26 नोव्हेंबर : उत्तरकाशीतील सिलक्यारा इथं निर्माणाधीन बोगद्यात 41 कामगार 15 दिवसांपासून अडकले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अनेक एजन्सी बचाव कार्यात गुंतल्या आहेत. अमेरिकन ऑगर मशीनमध्ये पुन्हा अडथळा आल्यानं बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनलंय.

उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात मजूर अडकून आता पंधरा दिवस झाले आहेत. मात्र कामगारांना वाचवण्यात सातत्यानं अडथळे येत आहेत. अमेरिकन हेवी ऑगर मशीननं सुरू झाली होती. बोगद्यातील ड्रिलिंग दरम्यान ऑगर मशीनचे ब्लेड खराब झालं होतं. त्यानंतर उभ्या ड्रिलिंग आणि मॅन्युअल ड्रिलिंगचा देखील विचार केला जात आहे. उभ्या ड्रिलिंगसाठी आधीच एक रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जागादेखील ठरवण्यात आली आहे. बचाव पथकाकडं अनेक पर्याय असले तरीही कामगारांच्या सुटकेची प्रतिक्षा मात्र लांबत चालली आहे.

बोगद्यात अडकलेले 41 मजूर गेल्या अर्ध्या महिन्यापासून मोकळ्या हवेत श्वास घेण्याची आशा बाळगून आहेत. अमेरिकन हेवी ऑजर मशीनमध्ये पुन्हा बिघाड झाल्यानं बचावकार्यात अडथळा येत आहे. बचाव कार्यादरम्यान अमेरिकन ऑगर मशीनमध्ये निर्माण झालेला अडथळा त्वरित दुरुस्त करण्याचं काम केले जाणार आहे. याशिवाय बोगद्यात मॅन्युअल ड्रिलिंगचं कामही केले जाणार आहे. व्हर्टिकल ड्रिलिंगचीही तयारी सुरू आहे. त्यासाठी आधी रस्ता आणि जागा निश्चित करून मशीनही तयार ठेवण्यात आली होती.

बोगद्यातील बचाव कार्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी अमेरिकन ऑगर ड्रिलिंग मशीन लवकरच पाइपलाइनमधून बाहेर काढण्यात येईल, अशी आशा व्यक्त केलीय. ही मशीन आता 22 मीटर मागे घेता येईल, असं सांगितलं. बचावकार्याशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, मॅन्युअल ड्रिलिंग लवकरच सुरू होऊ शकते. बचाव पथक आणि अडकलेल्या कामगारांमध्ये सुमारे 6 ते 9 मीटरपर्यंत पसरलेला उर्वरित ढिगारा आहे. जो लवकरच मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे काढलं जाईल.

उत्तरकाशी सिलक्यारा बोगद्यातील ढिगारा चार वेळा हटविताना हेवी ऑगर ड्रिलिंग मशिन काम करत असताना लोखंडी रॉडच्या जाळ्यावर आदळल्यानं ऑगर मशीनचं मोठं नुकसान झालंय. त्याचबरोबर बांधकाम सुरू असलेल्या सिलक्यारा बोगद्याच्या दुर्घटनेनंतर कामगारही निराश झाल्याचं पाहायला मिळत आहे. बोगद्याचं काम पुन्हा सुरू करण्याबाबत कामगारांमध्ये अजूनही संभ्रम आहे. बोगद्यात काम करणारे कामगार आता मजुरी न घेताच घराकडे निघू लागले आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें