बस दरीत कोसळली; भीषण अपघातात 36 जणांचा मृत्यू 19 जखमी.


मुंबई, दि. 15 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीर मधील डोडा जिल्ह्यातील असार क्षेत्रात प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. या भीषण अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. आज 15 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे.

किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस आसर भागातील त्रंगलजवळ सुमारे 250 मीटर उतारावरून दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना किश्तवाड जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, डोडा येथे दाखल करण्यात आले आहे.

गंभीर जखमींना विमानाने जम्मूला हलवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी पीएम नॅशनल रिलीफ फंडातून मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें