गोंदिया, दि. 08 नोव्हेंबर : निलंबित ग्रामसेवकाला लाच मागणारा लाचखोर! विस्तार अधिकारी 10 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ एसीबी च्या जाळ्यात अडकला आहे. तक्रारदार निलंबीत ग्राम सेवक वय ४० वर्ष, असे असून आरोपी लोकसेवक ज्ञानेश्वर रघुनाथ लंजे वय ५७ वर्ष, विस्तार अधिकारी पंचायत समिती गोंदिया असे आहे. तक्रार दाराला लाच द्यायची मुळीच इच्या नसल्याने त्यांनी गोंदिया एसीबी कडे तक्रार केली.
त्या आधारावर पळताळणी करून 10 हजार रुपयाची लाच स्विकारताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीस रंगेहाथ अटक केले आहे. तक्रारदार हे निलंबित ग्रामसेवक असून त्यांना निलंबित होउन तीन महिने झाले असून त्यांचे दोषारोप ( फाॅर्म नंबर 1 ते 4 ) तयार करून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया येथे पाठविण्याकरिता तक्रारदाराने विनंती केली असता.
आरोपी यांनी 10 हजार रुपयाची लाचेची मागणी करून पंचासमक्ष 10 हजार रुपयेची लाच स्वीकारली. आरोपी यास लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून यातील आरोपी लोकसेवक याने आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळवीला आहे. आरोपी याचे विरुद्ध पोलीस स्टेशन – गोंदिया शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सापळा कार्यवाही पथक विलास काळे पोलीस उप अधीक्षक, पो. नि. उमाकांत उगले, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे पो. हवा., संजयकुमार बोहरे, मंगेश काहलकर, नापोशि संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी, रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृती मोहीम नुकतीच करण्यात आली होती. त्या नंतर हा पहिलाच सापळा यशस्वी झाला आहे. त्या मुळे जनजागृती मोहीम यशस्वी झाल्याचे चित्र आहे.