- युवा जनसेवा पॅनलचे 5 सदस्य निवडणुकीत विजयी…
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 07 नोव्हेंबर : सरपंच पदाच्या उमेदवार रत्नमाला किशोर शेंडे विजयी झाल्या असून त्यांना निवडणुकीत 259 मत मिळाले आहेत. त्यांचा 32 मतानी विजय झाला आहे. तर हेमलता राजेश गायधने यांना 227 मत मिळाली असून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका येथील ग्राम पंचायत श्रीराम नगर येथे 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक संपन्न झाली असून ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील एक मात्र ग्राम पंचायत निवडणुकीच्या रिगणात उभी होती.
ग्रामपंचायत श्रीरामनगर हे पुनर्वशीत गाव असल्याने या गावातील नागरिकांच्या विविध मागण्या शासनाने मान्य न केल्यामुळे यापूर्वी झालेल्या निवडणुकीवर सदर गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकले होते. मात्र गावातील विविध विकास कामे रखडल्यामुळे गावातील नागरिकांनी अखेर निवडणुकीचा मार्ग निवडला असून 05 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.
गावात एकूण मतदान 562 इतकं आहे. तर 487 मतदारांनी मतदानाचे हक्क बजावला आहे. तर 75 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. एकूणच 86.65 टक्के मतदान झाले होते. 7 सदस्य आणि 1 सरपंच अशी एकूण 8 ची बॉडी ग्राम पंचायत मध्ये आहे. सात सदस्यांसाठी 14 उमेदवार, तर सरपंच पदाकरिता 2 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत 11 महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर 5 पुरुष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ना. मा. प्र. स्त्री. ) प्रवर्गातील दोन महिलां सरपंच पदा करिता निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून रत्नमाला किशोर शेंडे तर युवा जनसेवा पॅनलचे हेमलता राजेश गायधने या दोन महिला उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी लढत झाली. ही निवडणूक दोन पॅनलच्या माध्यमातून श्रीरामनगर येथे लढविली गेली. आज 07 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी संपन्न झाली.
असून सरपंच म्हणून रत्नमाला किशोर शेंडे या विजयी झाल्या आहेत. तर अन्य विजयी उमेदवार 1) कविता जागेस्वर वाढवे, 2) जयवांता पुरुषोत्तम रामटेके, 3) नरेश मनिराम मडावी, 4) राजू परसराम हेमने, 5) लीनाबाई विलास मळकाम, 6) उर्मिला महादेव म्हसराम, 7) शुभांगी सुदेश चांदेवार अशी नावे आहेत.
ग्रामविकास परिवर्तन पॅनल च्या सरपंच पदाच्या उमेदवार रत्नमाला किशोर शेंडे सह दोन सदस्य या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर युवा जनसेवा पॅनलचे 5 सदस्य या निवडणुकीत विजयी झाले आहे. त्या मुळे उप सरपंच हा युवा जनसेवा पॅनलचा असणार आहे. विशेष म्हणजे एक हाती सत्ता आली नसल्याने ग्राम पंचायत चालविताना सरपंचाची दमछाक होणार आहे.