एकच वादा पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अजित दादा : आमदार मनोहर चंद्रिकापुरे


  • सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. 

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 06 नोव्हेंबर : या कार्यक्रमाला पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातूनच का सुरुवात करण्यात आली, या मागचे सुद्धा कारण आहे, महाराष्ट्र मध्ये गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व सुरू होते. ते सूर्याचे पहिल किरण महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यावर पडतो. आणि सुरुवात जर चांगली झाली तर एकच वादा पुढच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अजित दादा, एकच वादा, असे प्रतिपादन उपस्थित कार्यकर्त्यांसमोर मंचावरून अर्जुनी मोरगांव विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे करीत होते ते दि. 06 नोव्हेंबर रोजी सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मंचावरून बोलत होते.



ते पुढे म्हणाले. प्रफुल पटेल यांचे नेतृत्व महाराष्ट्राला आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याला जलामृत करणार आहे. मी पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू शकलो याचे सर्व श्रेय मा. प्रफुल पटेल यांना जाते. माझ्या मतदार संघांमध्ये अनेक वर्षापासून पूलांचे बांधकाम होत नव्हते. आज 27 पुलाचे बांधकाम एकट्या माझ्या मतदार संघामध्ये केला आहे. मी जर आकडे तुम्हाला सांगायला लागलो तर जवळपास 9,27 कोटीचे कामे माझ्या मतदारसंघात साडेतीन वर्षात झाली आहे.



तटकरे साहेब आमची अशी इच्छा आहे. आमचे लोक छोटे मोठे काम सांगतात, मी विनंती करतो की, भंडारा गोंदिया खासदार चे मतदार संघ हे राष्ट्रवादीच्या कोट्याला आल पाहिजे आणि गडचिरोली चिमूर खासदार मतदारसंघ बाबांना अधिक माहिती असेल. ते सुद्धा आपल्याला आल. पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि त्या पद्धतीने समीकरण तयार होतात. आज गोंदिया जिल्ह्यातील विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच मतदार संघ जरी आमची युती झाली असली तरी आम्ही सिद्धांत पासून कुठे वळलो नाही. असे उपस्थित कार्यकर्त्यांन समोर मंचावरून ते बोलत होते.



गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील आशीर्वाद लॉन येथे आज 06 नोव्हेंबर रोजी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुनिल तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, धर्मरावबाबा आत्राम पालकमंत्री गोंदिया जिल्हा, राजेन्द्र जैन राष्ट्रीय सचिव राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मनोहर चंद्रीकापुरे आमदार अर्जुनी मोरगांव विधानसभा, सुरज चव्हान अध्यक्ष प्रदेश युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, रुपाली चाकणकर अध्यक्षा राज्य महिला आयोग व महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, प्रशांत कदम अध्यक्ष प्रदेश विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, सुनिल मगरे, अध्यक्ष प्रदेश सामाजिक न्याय विभाग, कल्याण आखाडे अध्यक्ष प्रदेश ओबीसी सेल, ईश्वर बाळबुध्दे समन्वय प्रदेश ओबीसी संगठन, गंगाधर परशुरामकर अध्यक्ष गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें