गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 03 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील एक मात्र ग्राम पंचायत निवडणुकीच्या रिगणात आहे. श्रीरामनगर येथे 5 नोव्हेंबरला निवडणूक संपन्न होत आहे. श्रीरामनगर ग्राम पंचायत येथे 7 सदस्य आणि 1 सरपंच अशी एकूण 8 लोकांची बॉडी आहे. सात सदस्यांसाठी 14 उमेदवार, तर सरपंच पदाकरिता 2 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीत 11 महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर 5 पुरुष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ना. मा. प्र. स्त्री. ) प्रवर्गातील दोन महिलांनी सरपंच पदा करिता निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यात ग्रामविकास परिवर्तन पॅनलकडून रत्नमाला किशोर शेंडे, तर युवा जनसेवा पॅनलचे हेमलता राजेश गायधने या दोन महिला उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी लढत होत आहे.
ही निवडणूक दोन पॅनलच्या माध्यमातून श्रीरामनगर येथे लढविली जात आहे. त्यासाठी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 79 पुरुष, तर 79 महिला मतदार आहेत. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 118 पुरुष, तर 122 महिला मतदार आहेत. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 79 पुरुष, तर 85 महिला असे एकूण मतदार 562 आहेत.
त्यात 276 पुरुष तर 286 महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक वॉर्डात निवडणुकीचा जोर वाढला आहे. निवडणूक कशी जिंकता येईल, याची फिल्डिंग लावली जात आहे. आज शेवटचा दिवस निवडणूक प्रचाराचा असल्याने, आज निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजता पर्यंत मतदारांना मतदान करण्याची वेळ असेल. 7 नोव्हेंबर रोजी मत मोजणी तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉल मध्ये होणार अशल्याची माहिती तहसीलदार ईंद्रायणी गोमासे यांनी माध्यमांना दिली आहे.