सड़क अर्जुनी, दी. 21 ऑक्टोबर : तालुका कांग्रेस अनुसूचित जाती सेलची तातडीची सभा दि. 20 ऑक्टोबर रोज तालुका अध्यक्ष हरीशभाऊ बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली सावंगी येथे पार पडली. सभेत बुथ निहाय अनुसूचित जातीची कमेटी तयार करणे व पक्ष संगठन वाढविणे, नागपुर येथिल कांग्रेस व भिमशक्ती संघटणेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणेबाबद चर्चा, व आगामी काळात तालुका स्तरीय मेळावा आयोजित करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष हरीषभाऊ बन्सोड यांच्यासह प्रदेश प्रतिनिधि दामोदर नेवारे, उपाध्यक्ष धनलाल शेंडे, रामलाल शाहारे, मोहपत राऊत, धम्मदीप सुर्यवंशी, मंगल वैद्य, सौ. आम्रपाली बन्सोड, देवकन्या तागडे, सपना मेश्राम, कृपासागर जनबंधु, इंदल फुल्लुके, कृष्णा बन्सोड, अजय शाहारे,धनराज वैद्य, जयप्रकाश शाहारे, नरेश डोंगरे, सुरज शाहारे, शंकर मेंढे, जगदीश करंजेकर, जितेंद्र दिहारी, हंसराज तागडे, सचिन बोरकर,भागवत मेश्राम, राधेश्याम कांबळे मुरपार, सुशिलकुमार उके, सुरेंद्र दहीवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन सुशिलकुमार उके यांनी तर आभार प्रदर्शन तालुका उपाध्यक्ष धनलाल शेंडे यांनी केले.