8 मार्च 2024 रोजी लागलेल्या आगीत जळून खाक झालेली हीच ती दोन दुकाने ( संग्रही छायाचित्र )
- तालुक्यातील शासकीय यंत्रणा कुचकामी, कारवाई होणार कधी ?
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 15 जानेवारी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर अश्लेले पूनर्वशीत गाव श्रीरामनगर हे सौंदड गावा लगत असून, साकोली ते देवरी मार्गावर आहे, 2012 मध्ये कालीमाती, कवळीवाडा, झलकारगोंदी, या गावाचा पुनर्वसन वनविभागाच्या या जागेमध्ये करण्यात आला आहे, 2017 नंतर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या अतिक्रमण करून दुकाने थाटण्याचा कारभार सुरू झाला आणि यालाच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत मूकसंमती दिली.
आज घडीला या ठिकाणी 50 ते 60 दुकाने या येथे उभी आहेत, या ठिकाणी ट्रक चालकांसाठी उपयुक्त साहित्याची विक्री केली जाते, किराणा दुकान, हॉटेल, धाबे, गॅरेज, बर्तन भांडे विक्री सारखे दुकाने सुरू आहेत, मात्र या दुकानाच्या आळून या ठिकाणी अवैध धंदे जोमात सुरू आहेत, मुख्य तर गॅस रिफिलिंग चा काळाबाजार येथे जोमात सुरू आहे, या ठिकाणी आलेले ग्राहक, दुकान दारांना वाहनातील साहित्य विक्री करतात, यात डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल, गहू , तांदूळ, लोखंडी सळ्या, कपडे, ब्लॅंकेट, साड्या, सह अनेक प्रकारचे साहित्य या ठिकाणी जोमात विक्री केली, तर दुकानदारांकडून ते खरेदी ही केले जाते.
- नशा होणाऱ्या साहित्याची होते खुले आम विक्री
त्याचबरोबर नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा, दारू, भुक्की पावडर, भांग, अफीम, अशा अनेक प्रकारचे नशा करणाऱ्या साहित्याची विक्री देखील केली जाते, खुलेआम सुरू असलेल्या या व्यवहाराकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे, की मुखसंमती आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, या ठिकाणी चर्चा आहे की, काही राजकीय लोकांच्या वरद हस्ताने हा काळाबाजार सर्रासपणे सुरू आहे, त्यामुळे यावर कारवाई करणार तरी कोण असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
- भीषण आगीत 10 ते 12 सिलेंडर गॅस चे झाले होते स्पोट
याच परिसरात 8 मार्च 2024 रोजी बोपाबोडी फाटा लागत असलेल्या दोन दुकानांना भीषण आग लागली होती, दरम्यान या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला, यात एक किराना दुकान तर दुसरे हॉटेल सह बर्तन विक्री ची दुकान होती, लागलेल्या आगीमुळे जवळपास 10 ते 12 सिलेंडर गॅस चे स्पोट येथे झाले होते, तर शेकडो गॅस सिलेंडर चे खाली हंडे येथे पडलेली होती, दरम्यान लागलेल्या आगीचा पंचनामा करण्यासाठी स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, यांनी या ठिकाणी झालेल्या घटनेची पाहनी केली होती, अवैध गॅस रिफीलिंगचा हा काळाबाजार सुरू असल्याची गवाई माध्यमांशी बोलताना एका नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती, मात्र त्यानंतर या ठिकाणी कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळेच पुन्हा हे व्यवसाय या ठिकाणी जोमात सुरू झाले.
- ब्लॅक मध्ये मिळतात सिलेंडर गॅस चे हंडे, अवैध ग्यास रिफिलींग नोजल च्या साह्याने
दुकानदारांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर गॅस चे हंडे येतात कुठून असा सवाल देखील तुम्हाला पडला असेल ना, तर दुकानदारांना गॅस एजन्सी धारकांकडून ब्लॅक मध्ये सिलेंडर गॅस च्या हंड्यांचा पुरवठा केला जातो, जो गॅस हंडा 850 रुपयाला घरगुती वापरासाठी विक्री होतो, तोच गॅस हंडा अशा दुकानदारांना ब्लॅक मध्ये 1000 ते 1100 रुपयांमध्ये सहजपणे उपलब्ध होतो, मोठ्या हंड्यातील गॅस लहान हंड्यात भरण्यासाठी एका नोजलचा वापर केला जातो, ग्राहकांना प्रति किलो गॅस 100 ते 120 रुपये दराने विक्री केली जाते, गॅस हंड्यामध्ये गॅस भरतांनाच आग लागण्याची भीती असते, आणि त्यामुळेच दुकाने जळण्याची किंवा मोठी हानी होण्याची शक्यता असते, आता यावर नियंत्रण करणारी यंत्रणा काय करते ? असा देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे, संबंधित यंत्रणा कुचकामी असल्यामुळेच अवैध गॅस रिफिलिंग चा हा काळा बाजार या ठिकाणी जोमात सुरू आहे, वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासन आता तरी कारवाई करणार का ? , याकडे संपूर्ण तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.