BREAKING NEWS : Ak47 : पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट!

अर्जुनी मोरगाव, दि. 16 जानेवारी : गोंदिया जिल्ह्याच्या नवेगावबांध पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या धाबेपवनी येथील एओपी येथे कर्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वतः जवळ असलेल्या AK 47 नामक बंदुकीने स्वतःच्या डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुःखद व खळबळ जनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार मृतक नामे पोलीस शिपाई जयराम पोरेटी वय वर्षे 50 बक्कळ नंबर 2424 असे आहे, देवरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम संबुटोला कडीकसा गावातील रहिवासी असून जयराम कोरेटे यांनी कर्तव्यावर कार्यरत असताना स्वतःच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न अनेकांना पडला आहे, याबाबद अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नसून, घटनेचा तपास नवेगावबांध पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस निरीक्षिका योगिता चापले या करीत आहेत.

विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे, ज्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस शिपायाने स्वतः जवळ असलेल्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाळून आत्महत्या केली आहे, त्यामुळे तपासा अंती खरे काय ते स्पष्ट होईलच, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सदर पोलीस शिपाई हा काही दिवसापासून आपल्या बदलीला घेऊन निराश होता, या माहिती मध्ये कितपत सत्यता आहे, हे ही तपासात समोर येणारच, पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर पोलीस शिपायाच्या मृतदेहाचे सववीच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Leave a Comment

और पढ़ें