सौंदड येथे सरपंच पतंग मोहत्सव निमित्ताने पाचशे पतंग चे वाटप

  • नायलॉन मांज्याचा वापर करू नये मुलांना केले सरपंच हर्ष मोदी यांनी आव्हाहन

सौंदड, दि. 14 जानेवारी : दरवर्षी प्रमाणे यंदा देखील सरपंच पतंग महोत्सवाचे आयोजन सौंदड येथील हिरबजी स्टेडियम च्या पटांगणावर आज दि. 14 जानेवारी रोजी करण्यात आले दरम्यान मंचावरून बोलताना सरपंच हर्ष मोदी यांनी उपस्थित मुलांना आव्हाहन केले असून त्यांनी बोलतांना सांगितले की नायलॉन मांज्याचा वापर करू नये, नायलॉन मांजा हा पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असून पर्यावरणासाठी देखील धोक्याचे आहे, त्या मुळे पतंग मोहत्सवाचा आनंद घेण्यासाठी सूती धाग्यांचा वापर करावे आणि पतंग महोत्सव संपल्या नंतर वापरलेला धागा इतरत्र न फेकता एकत्र करून ठेवावे ज्या मुळे पक्ष्यांना त्याचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

ग्राम पंचायत सौंदड, जनसेवा बहुउद्देशीय संस्था आणि सौंदड चे सरपंच हर्ष मोदी यांच्या संकल्पनेतून मागील दोन वर्षांपासून सरपंच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून आज तिसऱ्या सरपंच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रमाचे वेळी सरपंच हर्ष मोदी, जनसेवा परिवर्तन पॅनल चे अध्यक्ष संदीप मोदी, पं.स. सदस्या वर्षा शाहारे, उपसरपंच कुंदा साखरे, ग्रा.पं. सदस्य रंजू भोई, ग्रा.प. सदस्य प्रमिला निर्वाण, सामाजिक कार्यकर्ता ओंकार टेंभुर्णे, शालिकराम निर्वाण, मदन साखरे, त्रिषरण शाहारे उपस्थित होते, या वेळी असंख्य बालगोपाल उपस्थित होते दरम्यान पाचशे मुलांना पतंग व सूती धाग्यांचे चक्री चे वाटप करण्यात आले दरम्यान मुलांनी पतंग उडऊन मकर संक्रांतीचा सण साजरा केला.

Leave a Comment

और पढ़ें