रास्ता सुरक्षा अभियान अंतर्गत गोंदियात परिवहन विभागाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन

गोंदिया, दि. 17 जानेवारी : जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत दि.16 जानेवारी रोजी गोंदियात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून उपजिल्हाधिकऱ्यानी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. वाढत्या अपघातावर आळा घालण्यासाठी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने गोंदिया शहरात हेल्मेट चा वापर करित बाईक रॅली काढण्यात आली, यात नागरिकांनी देखील मोठ्या संख्येत भाग घेतला होता.

अनेकदा वाहन अपघातात दुचाकी चालक वाहन चालविताना हेल्मेट चा वापर करीत नाही, तर अपघात होताच वाहन चालकाच्या डोक्याला गंभीर इजा होते आणि एखाद्या वेळी त्याचा मृत्यू होतो, त्यामुळे दुचाकी वाहने चालविताना हेल्मेट चा वापर करा आणि चार चाकी वाहने चालविताना सीट बेल्ट चा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालावा असा सल्ला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी दिला आहे. तर या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालवावी हि जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली होती.

Leave a Comment

और पढ़ें