सौंदड, दि. 17 जानेवारी : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे, अश्या भावनेने प्रेरित होऊन IIIT नागपूरचे कॉम्प्युटर सायन्स चे तृतीय वर्षाचे विद्यार्थी आदित्य राऊत यांनी स्वयंस्फूर्त पद्धतीने स्थानिक पॅराडाईस इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांसमोर ड्रोनचे चित्त थरारक प्रात्यक्षिक प्रस्तुत केले. ड्रोन हवेत कोणत्या प्रणाली द्वारे कशे उडतो, राष्ट्रीय सुरक्षा, समाज, कायदा व सुव्यवस्था व शैक्षणिक दृष्टिकोनातून त्याचे उपयोग व महत्त्व काय या विषयी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती देण्यात आली, तसेच राऊत यांनी ड्रोन प्रत्यक्ष उडवून दाखविले, विद्यार्थ्यांनी असा वैज्ञानिक थरार पहिल्यांदाच अनुभवला.
“मी पण मोठा वैज्ञानिक होऊन देशाच्या रक्षणासाठी अश्या वस्तू बनविन” अश्या प्रकारचे मत चिमुकल्यांनी व्यक्त केले, सदर प्रात्यक्षिक बघून वितद्यर्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, राऊत यांची विद्यार्थ्यांसमोर ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्याची इच्छा ऐकताच मुख्याध्यापिका राजेश्री राऊत, संचालक संतोष राऊत व शाळा प्रशासनिक अधिकारी मुजम्मिल सैय्यद यांनी तत्परतेने आपली तयारी दर्शविली व त्यांना परवानगी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अस्वजित राऊत, दर्शना डोंगरवार, प्राची श्रीवास्तव, मीना रामटेके, मनीषा कांबळे, उषा बिसेन, ज्योती नेवारे, योगिता इरले, प्रणाली कापगते या शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले, संचालन योगी मस्के तर आभार उमेश कवरे यांनी मानले.