सुगंधित तंबाखू सह 13 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

गोंदिया, दि. 17 जानेवारी : बालाघाट वरून गोंदियाकडे येणाऱ्या एका वाहनात लाखो रुपये किमतीची सुगंधीत तंबाखू मिळून आली असून रामनगर पोलिसांच्या डी. पी. पथकाद्वारे ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 6 लाख 27 हजार 422 रुपये किमतीची सुगंधित तंबाखू व 7 लाख रुपये किमतीचे अशोक लेल्यांड कंपनीचे पीकअप वाहन असा एकूण 13 लाख 27 हजार 422 रुपये किमतीचा मुद्देला जप्त करण्यात आला आहे. सदर जप्तीची कारवाई दि.16 जानेवारी रोजी रात्री 8 : 30 वाजता करण्यात आली आहे.

यातील वाहन चालक आरोपी व वाहन ताब्यात घेतले असून वाहन क्रमांक : एम.एच. 35 ए.जे. 2613 असे आहे. या वाहनात सुगंधित तंबाखूच्या जवळपास दहा पिशव्या मिळून आल्या आहेत, ताब्यात घेण्यात आलेले वाहन चालक नामे बालाजी लक्ष्मीरायण नायडू असे आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर तंबाखू गोंदिया येथे विक्री करीता नेत असल्याची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन यांना गोंदिया पोलिसांनी पत्र वेव्हार केला असून पुढील तपास सुरू आहे. सदर सुगंधित तंबाखू कुणाची आहे आणि आरोपींवर गुन्हा कधी दाखल होणार याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळाली नाही.

 

Leave a Comment

और पढ़ें