सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 17 जानेवारी : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथे 2023 मध्ये जनसेवा परिवर्तन पॅनल ची सत्ता आली, यावेळी 9 सदस्य सह 1 लोक नियुक्त सरपंच अश्या 10 लोकांची बॉडी सत्ता रूढ झाली, हा आनंदाचा क्षण असल्याने येथील सरपंच हर्ष मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की सौंदड गावामध्ये आम्ही नवीन ईतिहास घडऊ व 5 वर्षात 5 उप सरपंच देऊ, त्या प्रमाणे पहिल्या वर्षी म्हणजेच दि. 09 जानेवारी 2023 रोजी नवीन बॉडी सत्तेत आली यावेळी भाऊराव यावलकर ( सोनार ) हे उप सरपंच पदी विराजमान झाले होते, एक वर्ष नंतर दि. 04 फेब्रुवारी 2024 रोजी कुंदा साखरे ( एस.सी.) यांना उप सरपंच पदावर विराजमान करण्यात आले, आता जवळपास एक वर्षाचा कालावधी होत असल्याने सौंदड गावातील नागरिक नव्या म्हणजेच तिसऱ्या उप सरपंचाच्या प्रतीक्षेत आहेत, तरी सरपंच साहेब तिसरे उप सरपंच सौंदड गावाला केव्हा मिळणार असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
सौंदड ग्राम पंचायत बॉडी मध्ये समाजाचे समीकरण
1) कुंदा ताई साखरे – एस.सी.
2) सुषमा ताई राऊत – एस.सी.
3) शुभम जनबंधू – एस.सी.
4) विजय चोपकर – माळी
5) प्रमिला ताई निर्वाण – माळी
6) रंजू ताई भोई – कुणबी
7) खुशाल ब्राम्हकर – कुणबी
8) भावराव यावलकर – सोनार
9) अर्चना ताई चन्ने – ढीवर
10) हर्ष मोदी – मारवाडी, सरपंच, अशी सत्ता पक्ष मध्ये असलेल्या बॉडीतील ग्राम पंचायत सौंदड येथे सदस्यांची यादी आहे, ग्राम पंचायत सौंदड येथे 15 सदस्य आणि 1 सरपंच अशी 16 सदस्यांची बॉडी आहे. सोनार आणि एस.सी. समाजातील दोन उप सरपंचाची नियुक्ती झाली असून आता उर्वरित समाजांच्या सदस्यांना संधी आहे. मात्र ही संधी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- हर्ष मोदी, सरपंच सौंदड –
महाराष्ट्रात एक मात्र सौंदड ग्राम पंचायत ही पहिली ग्राम पंचायत आहे जे पाच वर्षात पाच उपसरपंच पदावर बसवणार आहे, त्या मुळे गावातील प्रत्येक समाजातील सदस्याला उप सरपंच पदावर विराजमान करून त्या समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न आहे, तसेच दोन वर्षे पूर्वी मी दिलेले आश्वासन पूर्ण करीत आहे, फरवरी महिन्यात नव्या उपसरपंचाची निवड होण्याची शक्यता आहे, त्यात ओबीसी प्रवर्गातून माळी किंवा कुणबी या समाजातील सदस्याची उपसरपंच पदा करीता वर्णी लागन्याची शक्यता आहे.