लोहिया विद्यालयातील वर्षा डोंगरवारची विभागीय स्तराकरीता निवड


सौंदड, दि. 09 ऑक्टोंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अंडर 19 या वयोगटातील विद्यार्थ्यांनी दि. 07 ऑक्टोंबर रोजी गोंदिया येथे आयोजित धावण्याच्या जिल्हास्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्यामध्ये वर्ग 12 वी कला शाखेची विद्यार्थीनी कु. वर्षा पुंडलिक डोंगरवार हीने 800 मिटर व 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे व तीची विभागीय स्तराच्या स्पर्धेकरीता निवड करण्यात आलेली आहे.

तिने आपल्या यशाचे श्रेय जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था सौंदड, पंकज लोहिया संस्था सदस्य, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, गुलाबचंद चिखलोंढे मुख्याध्यापक, मनोज शिंदे, पर्यवेक्षिक डी. एस. टेंभुर्ण, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, विद्यालयातील शारीरिक शिक्षिका यु. आर. बाच्छल मॅडम व श्री एस. यु. पवार सर तसेच आपल्या आई- वडिलांना दिले आहे. सर्वांनी तीचे अभिनंदन केले व तिला पुढील यशाकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें