तलाठी किशोर सांगोडे यांच्या साज्यातून रेतीची चोरी जोमात; कारवाई सुन्य!


बेल बंडी धारकांची वाळू आता ट्रक व ट्रॅक्टर धारक खरेदी करतात… 


सडक अर्जुनी, दि. 06 ऑक्टोंबर : तालुक्यातील ग्राम तेली घाटबोरी, कोहळी घाटबोरी, परसोडी, वडेगाव या भागातून नियमित वाळूची ट्रॅक च्या माध्यमातून वाहतूक सुरू असते. सध्या तालुक्यातील एकही वाळू घाटाचे लिलाव झालेले नाही, अश्यात वाळू येते कुठून हा चर्चेचा विषय बनला आहे. तालुक्यातील नदी व नाल्यात पाणी भरला असला तरी खुल्या जागेतून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

विशेष म्हणजे वेवसाईक बैल बंडी धारक नदी पात्रातून वाळू चा उपसा करून गावा बाहेर वाळूचे ढीग ठेवतात तर हेच वाळू रात्रीला ट्रॅक मध्ये भरून बाहेर विक्री करीता पाठविली जाते. 2 ब्रास वाळूच्या ट्रॅक ची किंमत 7 ते 10 हजार रुपये एवढी प्रचंड वाढली आहे. त्या मुळे वाळू चोरांना कमाईचा मोठा मार्ग मिळाला आहे. अनेक बातम्या प्रकाशित करून सुधा संबंधित यंत्रणा यावर कारवाई का करीत नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

विशेष म्हणजे तेली घाटबोरी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या भागातून रेती चोरी होते या बाबद तहसीलदारांना निवेदन देखील दिले आहे. असे असले तरी अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. असे माध्यमांना त्यांनी सांगितले आहे. या भागातील तलाठी किशोर सांगोळे यांच्याशी आम्ही भ्रमणध्वनि वरुण संपर्क केला असता संपर्क झाला नाही. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यावर कार्यवाई करणार का ? असा सवाल जणते मध्ये निर्माण झाला आहे. शासनाची होत अशलेली अवेध वाळू उपशयातून लाखोंची चोरी नियमित चालू राहील की कधी बंद होणार.

भागवत झिंगरे , त. मु. स. अध्यक्ष तेली घाटबोरी :

आम्ही तहसीलदार नीलेश काळे यांना व स्थानिक ग्राम पंचायत यांना लेखी पत्र दिले आहे. आमच्या भागातील नदी पात्रातुण वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते याबाबद व अन्य विषय आहे, मात्र अध्याप प्रशासनाने कुठलीही कार्यवाई केली नाही. यावरून असे लक्ष्यात येते की सर्व मिळून काम करतात.


 

Leave a Comment

और पढ़ें