कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा व जिल्हा परिषद शाळा खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा – मिथुन मेश्राम


सडक अर्जुनी, दी. 06 ऑक्टोबर : देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाशी झुंजवत ठेवून कुशल व अकुशल नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करत आहे. अशा पद्धतीची नोकर भरती ही सुशिक्षित तरुणांचे शोषण करणारी आहे, सरकारने ही कंत्राटी नोकर भरती तात्काळ थांबवावी.

६२,००० शाळा खाजगीकरणाचा निर्णय घेतला तो रद्द करण्यात यावा. तलाठी भरती वन भरती मध्ये झालेल्या पेपर फुटीवर SIT चौकशी करण्यात यावी. अर्जुनी मोरगाव उप विभाग मध्ये झालेल्या कोतवाल भरतीची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे . अन्यथा तरुणांच्या हितासाठी रस्त्यावर उतरु, असा इशारा युवा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी दिला.

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ ला मिथुन मेश्राम यांच्य नेतृत्वात तहसीलदार सडक अर्जुनी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी मिथुन मेश्राम, डायमंड डोंगरे , आशिष येरणे, राहुल भोयर, कपील बारसागडे, मितेश कोरे, धनराज भुझाडे, चेतन मोहतुरे, संघर्ष बोलके, राहुल बोलके, प्रणय फुंडे, दीपेंद्र बडोले, अनिकेत पुसाम, गणेश तुरकर, महेंद्र झिंगरे, दामोदर लाडे, कमलेश शेंडे, चिंतामन लंजे, एकनाथ शिवणकर, भक्तप्रल्हाद कावळे, भुपेंद्र कोरे, पवन रहांगडाले, सुनिल बावनकर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें