बावणकुळे साहेब धाब्यावर या ना ? , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी दिले धाब्यावर जेवणाचे निमंत्रण


  • बावनकुळेच्या आवडीनुसार राहणार मेन्यू

भंडारा, दि. 29 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपविरूद्ध बातम्या प्रकाशित होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ‘पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या’ असा सल्ला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एका बैठकीत दिला. चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांची विशेष काळजी घेत असल्यामुळे त्यांचे ऋण फेडण्यासाठी भंडाऱ्यातील पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यात १ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता साईकृपा ढाबा, कवडशी फाटा, नागपूर रोड शहापूर येथील धाब्यावर जेवणासाठी निमंत्रण पत्रिका दिली.

आज 29 सप्टेंबर रोजी सर्व पत्रकारांनी खासदार सुनील मेंढे यांच्या घरी जाऊन खासदारांच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडाऱ्यात जेवणासाठी निमंत्रण पत्रिका दिली आहे. या निमंत्रण पत्रिकेत चहा आणि जेवणाची व्यवस्था केलेली असून जेवणात बावनकुळे यांच्या आवडीनुसार मेन्यू राहील तसेच त्यांना अपेक्षित पाण्याचीही व्यवस्था केली असल्याचे नमूद केले आहे. जेवणाचे संपूर्ण बिल देण्यासाठी पत्रकार सक्षम असल्याचेही यात स्पष्ट केले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें