विद्युत विभागाच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी पती – पत्नी जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी.


सडक / अर्जुनी, गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 20 सप्टेंबर 2023 : तालुक्यातील ग्राम घाटबोरी / कोहळी येथील शेत शिवारात विद्युत विभागाच्या हलगर्जी पणामुळे शेतकरी पती – पत्नी ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

तालुक्यातील ग्राम कोदामेडी ते शिंदिपार मार्गावरील आपल्या शेतात भात पिकाची निंदणी ( कचरा काढत असताना ) काढण्याचे काम करीत असताना दोन भाऊ व त्यांची पत्नी असे चार लोक शेतात आज सकाळी गेले असता. शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी तुळशीदास रेवाराम लंजे वय 45 वर्षे, त्यांची पत्नी सौ. मायाबाई तुळशीदास लंजे वय वर्ष 42 वर्षे हे दोघेही जागीच ठार झाले तर सौ. इंदुबाई हिरालाल लंजे वय 43 वर्षे अंदाजे वय या जखमी अवस्थेत आहेत. त्यांचे पती सुधा घटणास्थळी उपस्थित होते. त्यांच्या लक्ष्यात आले की इथे विद्युत पुरवठा चालू आहे. त्या मुळे त्यांनी विद्युत तारेला लाकडी काठीने लांब फेकले त्या मुळे इंदुबाई हिरालाल लंजे यांचे प्राण वाचवले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहिती नुसार शेतकरी लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाचे 33 एल. टी. ची लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने सदर लाईन चे तार 5 ते 6 दिवसापासून तुटून पडले होते. याची माहिती काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे काही शेतकरी सांगतात. तर ही बाब सदर शेतकऱ्याला माहीत नव्हती त्या मुळे चालू विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना आज दीं. 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिंदिपार ते कोदामेडी मार्गावरील शेत शिवारात घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शेतकरी व गावकरी घटनास्थळी उपस्थित झाले. दरम्यान घटनास्थळी पोलिस विभागाचे व विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा तय्यार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्युत विभागाने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


 

Leave a Comment

और पढ़ें