आंदोलनाची दखल ; पोलीस पाटिल भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगीती, ओबीसी इंपॅक्ट ?


  • गोंदियातिल ओबीसी आंदोलना एस.सी, एस.टी. आमदारांनी दिला पाठींबा.
  • गोंदियातील ओबीसी समाजाचा आंदोलन तात्पुरता मागे.
  • गुरवार पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर होणार आंदोलनाला सुरवात.

गोंदिया, दी. 19 सप्टेंबर 2023 : गोंदिया जिल्यातील ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या सर्व जातीय समाज बांधवानी 18 सप्टेंबर रोजी गोंदियात मोर्चा काढत मोर्च्याचे सभेत रूपांतर करून आंदोलन केले. असून जिल्हाधिकाऱ्यांनी फोन वर बोलत आंदोलकांच्या काही मागण्या तात्पुरत्या स्वरूपात दोन दिवसात पूर्ण करून देणार असल्याचे सांगितल्याने ओबीसी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे.



सकाळ पासून सुरु असलेल्या आंदोलनाला गोंदिया जिल्यातील देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी देखील पाठींबा दिल्याने ओबीसी बांधवानचा उत्साह आणखी वाढला होता. तर दुसरीकडे संध्याकाळ होऊनही अधिकारी आंदोलन स्थळी न आल्याने ओबीसी बांधवानी रास्ता रोको आंदोलन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची दखल घेत पोलीस पाटिल भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगती दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला.

असून मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करू नये. ओबीसी समजाची जनगणना लवकरात लवकर करावी. अश्या प्रमुख मागण्याना घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते. तर बुधवार पर्यत जर तोडगा निघाला नाही. तर गुरुवार पासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ओबीसी बांधव साकाळी उपोषण करणार असल्याची माहिती ओबीसी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे यांनी माद्यमाना दिली आहे.

यावेळी प्रामुख्यानेउपस्थित बबलू कटरे ओबीसी कृती समिती जिल्हा अध्यक्ष गोंदिया, मनोहर चंद्रिकापुरे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र, सहसराम कोरोटे आमदार देवरी आमगाव विधानसभा क्षेत्र, सोनू कुथे कृषी सभापती जिल्हा परिषद गोंदिया आणि अनेक न्यावर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलन करीता संपूर्ण जिल्ह्यातून ओबीसी बांधव गोंदिया येथे आपल्या वाहनाने उपस्थित झाले होते. मुख्यःत सडक अर्जुनी वरून 65 वाहनाने ओबीसी बांधव आंदोलन स्थळी दाखल झाले होते. यावेळी रॅली चे आयोजन करण्यात आले होते.


 

Leave a Comment

और पढ़ें