शुभ महालक्ष्मी एंटरप्राईस तर्फे सकोलीत भव्य लक्की ड्रॉ संपन्न.


  • अनेकांना मिळाले मोठे बक्षीस, मारोती अल्टो कार, हिरो स्प्लेंडर मोटार सायकल, 35 हजार रुपयाचे सोने व आणखीन बरेच काही…

साकोली, ( बबलु  मारवाडे) दि. 29 ऑगस्ट : शुभ महालक्ष्मी एंटरप्राईस तर्फे लक्की ड्रॉ चे आयोजन भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुका येथील एम.बी. पटेल कॉलेज मार्गावर असलेल्या संत जगनाडे महाराज लॉन येथे दि. 27 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.





शुभ महालक्ष्मी एंटरप्राईस चे हे पाचवे लक्की ड्रॉ संपन्न झाले. दर महीण्याला 12 लक्की विजेते या ड्रॉ च्या माध्यमातून निवडले जातात. चवथ्या लक्की ड्रॉ चे साहित्य या कार्यक्रमात वाटप करण्यात आले. यामध्ये अनेकांना मोठे बक्षीस वितरण करण्यात आले. जसे की मारोती अल्टो कार, हिरो स्प्लेंडर मोटार सायकल, एच.एफ. डिलक्स मोटार सायकल, 35 हजार रुपये किमतीचे सोंने, फ्रिज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, वन प्लस कंपनीचा मोबाईल, सोफा सेट सारखे ब्रॅण्डेड साहित्य ग्राहकांना पुरवठा केला जातो.

27 ऑगस्ट रोजी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेंद्र ठाकरे यांचे जन्मदिन निमित्ताने भव्य लक्कि ड्रॉ व ड्रॉ मध्ये मिळालेले साहित्य बक्षिस वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कंपनीचे ग्राहक उपस्थित होते. तर केक कापून कंपनीचे मॅनेजर डायरेक्टर श्री ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनीतर्फे डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या पूर्वी लक्षमी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर पाचव्या लक्की ड्रॉ चे चिट्ठी काढून विनर असलेल्या ग्राहकांचे नाव घोषित करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शुभ महालक्ष्मी एंटरप्राईस चे मेनेजिग डायरेक्टर महेंद्र ठाकरे, एम.डी. निलय झोड़े, डायरेक्टर प्रतिभा पारधी, डायरेक्टर मनीषा काशीवार, पूजा देशमुख सरपंच जमनापुर ग्रा. प. सह अन्य ग्राहक व पाहुणे उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें